कोरोना घटला ! एका दिवसात सापडले 425 नवे कोरोनाबाधित

कोरोना घटला ! एका दिवसात सापडले 425 नवे कोरोनाबाधित

Corona Update : मागील काही दिवसांपासून उताराला लागल्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. रुग्णसंख्या वाढत चालली आहे. असे असले तरी कालच्या तुलनेत आज मात्र रुग्णसंख्या घटल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात 425 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. काल गुरुवारी (दि.31) दिवसभरात 694 रुग्ण आढळले होते.

राज्यात काही दिवसांपासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. देशातही काही राज्यात रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाने चिंता वाढवली, राज्यात कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत 63 टक्कांनी वाढ, एका दिवसांत 694 प्रकरणे आढळली

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात एकूण 425 नवीन रुग्ण सापडले. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 351 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 79 लाख 92 हजार 580 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के झाले आहे.

पुण्यासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थिती आवाक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जमणे टाळण्याचे आवाहन केले आहे आणि संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी मास्क वापरण्याचे देखील आवाहन केले आहे.

मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गाइड्सलाईनमध्ये सांगितलं की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यात ताबडतोब वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकाच दिवसात 3,016 ताज्या कोरोनाव्हायरस प्रकरणांची वाढ झाली, जे जवळपास सहा महिन्यांतील सर्वाधिक आहे, तर सक्रिय प्रकरणे 13,509 पर्यंत वाढली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube