Download App

सोलर पॅनल योजना नेमकी आहे तरी काय? वाचा!

LetsUpp | Govt.Schemes
● महागाईच्या (inflation)काळाचा थोडीशी बचत देखील मोठा दिलासा देते. दरमहिन्याच्या घर खर्चात वीज बिलाचा समावेश असतो. वीज दर (electricity rates)जसे वाढत आहेत त्याप्रमाणे वीजबिलाचा खर्चही वाढत आहे. त्यात सध्या देशात विजेचे संकट पाहायला मिळत आहे. एकीकडे वीज प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा जाणवत आहे, तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हात वीजपुरवठा खंडित (Power outage)झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
● अशा कठीण काळात वीज संकटावर मात करण्यासाठी ग्रीन एनर्जी फायदेशीर ठरु शकते. सोलर पॅनल (Solar panel)हा वीज संकटासाठी चांगला पर्याय आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारची आर्थिक मदतही मिळते. सरकारडून सोलर पॅनलवर सबसिडी मिळते.
● जर तुम्हाला सोलर पॅनल बसवायचे असतील तर आधी तुम्हाला किती वीज लागते हे समजून घ्या. मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सोलर पॅनेल आहेत. यामध्ये पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागातून वीज निर्माण होते. अशी चार सोलर पॅनल एकत्र ठेवल्यास तुम्हाला दररोज 6-7 युनिटपर्यंत वीज सहज मिळेल. हे 4 सोलर पॅनल सुमारे 2 किलोवॅटचे असतील.

अपघाताच्या आठवणीने नितीन गडकरी भावूक; म्हणाले, म्हणून मी वाचलो

शासनाकडून अनुदान मिळते? : भारतात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी Ministry of New & Renewable Energy ने सोलर रूफ टॉप योजना सुरू केली आहे. डिस्कॉमच्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल लावू शकता आणि सबसिडीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये रुफटॉप सोलरची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारीही विक्रेत्याची असेल.

40 टक्क्यांपर्यंत सबसिडी : तुम्ही 3 किलोवॅटपर्यंत सोलर रुफटॉप पॅनेल बसवल्यास, सरकार तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल. त्याच वेळी, जर तुम्ही 10 किलोवॅटपर्यंत सोलर पॅनेल लावले तर तुम्हाला 20 टक्के सबसिडी मिळेल. स्थानिक वीज वितरण कंपनी (डिस्कॉम) ही योजना राज्यांमध्ये चालवत आहे.

किती खर्च येईल? : जर तुम्हाला 2 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवायचे असेल तर त्याची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये असेल. मात्र यावर तुम्हाला सरकारकडून 40 टक्के सबसिडी मिळेल, त्यानंतर तुमचा खर्च 72,000 रुपयांपर्यंत खाली येईल आणि तुम्हाला सरकारकडून 48,000 रुपये सबसिडी मिळेल. सोलर पॅनेलचे आयुष्य 25 वर्षे आहे. अशा परिस्थितीत, एकाच वेळी एवढी गुंतवणूक करून, तुम्ही महागड्या विजेपासून दीर्घकाळ सुटका मिळवू शकता आणि तुम्हाला एक प्रकारे मोफत वीज मिळेल.

अर्ज कसा कराल? : सोलर रूफटॉप बसवण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://solarrooftop.gov.in/ वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला सोलर रूफटॉपसाठी अर्ज करावा लागेल. तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्ही राज्यानुसार लिंक निवडा. त्यानंतर फॉर्म उघडेल. यामध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती भरा. सोलर पॅनेल बसवल्यानंतर 30 दिवसांच्या आत डिस्कॉमद्वारे प्रदान केलेल्या तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us