अपघाताच्या आठवणीने नितीन गडकरी भावूक; म्हणाले, म्हणून मी वाचलो

अपघाताच्या आठवणीने नितीन गडकरी भावूक;  म्हणाले, म्हणून मी वाचलो

Nitin Gadkari :  भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संपूर्ण देशभरामध्ये रस्ते बांधणीसाठी ओळखले जातात. 2014 पासून त्यांच्याकडे रस्ते वाहतूक व दळणवळण हे खाते आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये त्यांनी अनेक हायवेंची निर्मिती केली आहे. अगदी 1995 साली राज्यामध्ये युती सरकार असताना देखील त्यांच्याकडे रस्ते बांधणीचे खाते होते. तेव्हा त्यांनी मुंबई-पुणे हायवे बांधला होता. त्यामुळे देशभर त्यांची चर्चा झाली होती. यानंतर आता त्यांनी बोलताना आपल्या एका अपघाताची आठवण सांगितली आहे. यावेळी ते भावूक झालेले देखील दिसून आले.

नितीन गडकरी यांच्या हस्ते सूर्योदय फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘गिफ्टिंग ऑफ साऊंड’ या उपक्रमाचे उद्घाटन मुंबई येथे झाले. या वेळी श्री गडकरीजी म्हणाले, “भारतीय संस्कृतीत समाजाचे ऋण फेडण्याची परंपरा आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर प्रत्येकाने समाजाला काहीतरी देण्याचा, समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सूर्योदय फाऊंडेशनचा हा उपक्रम या विचाराशी निगडित आहे, ही मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

Salman Khan धमकीप्रकरणी मोठी अपडेट; मेल प्रकरणी एका विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट नोटीस

यावेळी त्यांनी आपल्या अपघाताची आठवण सांगितली आहे. 2004 मध्ये पोलिस प्रोटेक्शनमध्ये माझा अपघात झाला होता. मला लाल दिव्याची गाडी होती. बरोबर 10-12 गाड्या होत्या. माझी पत्नी, मुलगी, मुलगा गार्ड असे आम्ही गाडीत होता. पुढे जवळपास 2-3 पोलिसच्या  गाड्या मागे पोलिसांच्या 5-6 गाड्या होत्या. पूर्ण सुरक्षेमध्ये माझ्या गाडीला अपघात झाला. गाडी पूर्ण ट्रकच्या खाली गेली होती. यानंतर ज्यांनी गाडी पाहिली तेव्हा लोकांचा विश्वास नाही बसला की आम्ही वाचलो कसे, हे सांगताना गडकरी भावूक झालेले पहायला मिळाले होते, असे ते म्हणाले आहेत.

मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त

पण मी व माझा परिवार यातून बरे झालो. तेव्हा मला एकाने विचारले की हे कसं झालं. ज्यावेळी मी 1980 साली आमदार तेव्हापासून मी 30 ते 35 हजार लोकांचे हार्टचे ऑपरेशन केले आहे. त्यामुळे त्या लोकांचे जे आशीर्वाद होते, त्यामुळे मी वाचलो, असे गडकरी म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube