Download App

पुण्यातील ‘बाळाचा’ 17 व्या वर्षीच कारनामा… पण ‘दारु पिण्याचं नेमकं वय किती?’

मद्य पिण्यासाठी महाराष्ट्रातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही नियम घालून दिले आहेत.

पुण्यातील पोर्शे कार अपघात अन् दोन निष्पाप जिवांचा गेलेला बळी या घटनेनंतर संपूर्ण राज्य ढवळून निघाले. बिल्डर पुत्राला पोलिसांकडून मिळालेली विशेष वागणूक, आमदार महोदयांनी घातलेले लक्ष, त्याला कथितरित्या खायला मिळालेला पिझ्झा-बर्गर, अवघ्या 15 तासांत मिळालेला जामीन आणि त्यानंतर सुनावलेली हास्यास्पद शिक्षा अशा सगळ्या मुद्द्यांनी ही घटना प्रचंड गाजली. वाहतूक नियमांचाही उहापोह झाला. या घटनेत आणखी एक मुद्दा गाजला तो म्हणजे मद्य पिण्यासाठीचे वय. (State Excise Department of Maharashtra has laid down certain rules for drinking liquor.)

या घटनेतील 17 वर्षीय मुलाच्या दारु पिण्याच्या मुद्द्याची बरीच चर्चा झाली. त्याला मद्य देणाऱ्या पब आणि बारला सील लागले. मालकांवरही कारवाई झाली. यावरुनच मद्य पिण्यासाठीही वयाची अट आहे, ही गोष्ट प्रकर्षाने समोर आली. मद्य पिण्यासाठी महाराष्ट्रातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही नियम घालून दिले आहेत. यात आणखी एक लक्षात घेण्यासारखा नियम म्हणजे, मद्य पिण्यासाठी केवळ वयाचीच नाही तर पवान्याचीही अट असते. ज्या प्रमाणे 18 वर्षे पूर्ण केल्यानंतरही गाडी चालविण्यााठी परवाना आवश्यक असतो, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही मद्य पिण्यासाठीचे वय पार केल्यानंतर तुम्हाला त्यासाठी परवानाही घ्यावा लागतो.

पाहुयात काय आहेत दारु पिण्यासाठीचे नियम?

पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी अल्कोहोलची मात्रा असणारी मद्ये म्हणजे माईल्ड बियर, ब्रिझर पिण्यासाठी वयाची 21 वर्षे पूर्ण करणे गरजेचे असते. ब्रिझरमध्ये अल्कोहोल नसते, असे अनेकजण म्हणतात. पण, त्यातही 4.8 टक्के अल्कोहोल असतेच.

“शहांचा राज्यपालपदाचा शब्द, दरेकरांनी विनाकारण बोलू नये”; किर्तीकरांसाठी अडसूळ मैदानात

तर पाच टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोलची मात्रा असणारी मद्ये असतात ती पिण्यासाठी वयाची 25 वर्षे पूर्ण करणे गरजेचे असते. यात स्ट्राँग बिअरपासून ते 42 टक्क्यापर्यंत प्रमाण असणाऱ्या वोडका आणि देशी दारुचा समावेश होतो.

25 वर्षे पूर्ण करण्यासोबतच मद्य सेवन परवाना (लायसन्स) गरजेचा असतो. तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अधिकृरित्या मद्यपान करून शकत नाही.

मद्यपानासाठी परवाना का गरजेचा असतो? –

अनेक जणांना मद्यपान करण्यासाठी परवाना लागतो, हे देखील माहिती नसते. मद्य पिणाऱ्यांपैकी जवळपास 80 टक्के नागरिकांकडे परवानाच नसतो. या परवान्यानुसार तुम्हाला दारू पिण्याची क्षमता ठरवून दिलेली असते. मद्य खरेदी करताना तुम्हाला तुमच्याकडे असलेले लायसन्स दुकानात दाखविणे गरजेचे असते.

मद्य सेवनाचा परवाना ऑनलाईनही काढता येतो. हा परवाना एका दिवसाचा, एका वर्षाचा किंवा आयुष्यभराचाही मिळतो.

मद्य सेवनाचा परवाना मिळवण्यासाठी वैद्यकीय अहवालाची आवश्यकता असते. शरीराला मद्यसेवनाची गरज असल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला असेला तर, परवाना दिला जातो.

मद्य सेवनाचा परवाना कसा काढायचा?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे सर्विसेस यादीवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला किती दिवसांसाठी मद्य सेवन परवाना पाहिजे ते निवडा. ऑनलाइन अर्ज दाखल करा. ऑनलाइन अर्जासाठी डिजिटल फोटो आणि सही, ओळखपत्र (आधारकार्ड किंवा व्होटर आयडी), रहिवासी दाखला, डॉक्टर परवाना आदी कागदपत्रे आवश्यक असतात. शुल्क म्हणून वर्षभराच्या परवान्यासाठी 100 रुपये आणि कायमच्या परवान्यासाठी एक हजार रुपये आकारले जातात.

जगातील ‘या’ दहा देशांची पर्यटनात आघाडी, कमाईतही अव्वल; भारताचा नंबर कितवा?

यापूर्वी महाराष्ट्रातही मद्य सेवनाचे वय 21 होते. मात्र 2011-12 मध्ये समाजकल्याण व व्यसनमुक्ती मंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यसनमुक्ती धोरणात बदल केला. यात मद्य सेवनाचे वय 21 वरुन 25 पर्यंत वाढविले. तेव्हापासून महाराष्ट्रात मद्य सेवनाचे वय 25 आहे. त्याखालील व्यक्तीला मद्य विक्री केल्यास किंवा सेवनासाठी दिल्यास संबंधित दुकान, बार कायदेशीर कारवाईसाठी पात्र ठरते. शिवाय दारु पिणारी व्यक्तीही दंडात्मक कारवाईसाठी पात्र ठरते.

इतर राज्यांमध्ये काय आहे मद्य सेवनाचे वय?

जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार, गोवा, पुडुचेरी, राजस्थान आणि सिक्कीममध्ये मद्यपानाचे कायदेशीर वय किमान 18 वर्षे आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मेघालय, मिझोराम, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये दारू पिण्याचे किमान कायदेशीर वय 21 वर्षे आहे. केरळमध्ये दारू पिण्याचे किमान वय 23 वर्षे आहे. तर पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये दारू पिण्याचे किमान कायदेशीर वय 25 वर्षे आहे. दिल्लीतही दारू पिण्याचे किमान वय 25 वर्षे होते. मात्र नवीन उत्पादन शुल्क धोरणात हे वय 21 वर्षे करण्यात आले आहे.

follow us

वेब स्टोरीज