Download App

राज्य विधी सेवा प्राधिकरणात लेखापाल पदांची भरती, पगार 25,000; ‘या’ तारखेपर्यंतच करता येणार अप्लाय

  • Written By: Last Updated:

Maharashtra State Legal Services Authority Recruitment : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल (Accountant) पदावरील रिक्त जागा ह्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या भरतीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती दोन पदांसाठी असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.legalservices.maharashtra.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उमदेवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. कारण, अर्जात काही त्रुटी राहिल्यास अर्ज बाद होणार आहे. (State Legal Services Authority Recruitment for the post of Accountant salary 25000 thousand)

राज्य विधी सेवा प्राधिकरणाने एकूण 2 रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. उमदेवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

पदाचे नाव – लेखापाल.

एकूण रिक्त पदे – 2

शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार हा भारतीय नागरिक असावा
2. उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान बॅचलर ऑफ कॉमर्स ही पदवी धारक केलेली असावा.
3. उमदेवाराला दोन वर्षाचा लेखापाल पदाचा अनुभव असावा
4. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
5. टायपिंग स्पिड 30 wpm(मराठी आणि इंग्रजी)
6. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची समज

Gujarat Riots : तीस्ता सेटलवाड यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 

आवश्यक कादपत्रे-
फोटो, दहावी-बारावीचे प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, एमएससीआटीचे प्रमाणपत्र, टायपिंगचे प्रमाणपत्र, जातीचा दाखल, रहिवाशी पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.

अर्जाची पद्धत – ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, 105, उच्च न्यायालय, पी. डब्यु. डी, बिल्डिंग, फोर्ट, मुंबई 400032

वेतन – 25,000 रुपये दरमहा

निवड प्रक्रिया –
प्राप्त झालेल्या उमदेवारांमधून योग्य उमदेवारांची मुलाखतीतीसाठी निवड केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट – legalservices.maharashtra.gov.in

जाहिरात– https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/ADVERTISEMENT_17_07_2023.pdf

Tags

follow us