Gujarat Riots : तिस्ता सेटलवाड यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Gujarat Riots : तिस्ता सेटलवाड यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Tista Setalwad : तिस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आज 19 जुलैला सर्वोच्च न्यायालायाने जामीन मंजूर केला आहे. तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुजरात दंगल प्रकरणात खोट्या कागदपत्रांच्या आधारे उच्च अधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर 1 जुलैला उच्च न्यायालयाने सरेंडर करायला सांगितलले होते. (Tista Setalwad got Bail from Supreme Court)

Sholay सिनेमा हा हॉलिवूडमध्ये आला असता तर? एकदा व्हिडीओ पाहाच…  

काय आहे प्रकरण?

तिस्ता सेटलवाड यांच्यावर 2022 च्या गोध्रा दंगल प्रकरणात तत्कालीन गुजरात सरकारच्या उच्च अधिकार्‍यांना गोवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. गुजरात हायकोर्टाने त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Sai Tamhankar : सई ताम्हणकरचे लेटेस्ट फोटोशुटने चाहत्यांना लावले वेड

दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात तीस्ता सेटलवाड सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्या होत्या. सुरूवातीला त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला नव्हता मात्र आता तीस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आज 19 जुलैला सर्वोच्च न्यायालायाने जामीन मंजूर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

सर्वोच्च न्यायालायाने या प्रकरणावर सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. त्या आदेशामध्ये सेटलवाड यांचा जामिन रद्द करण्यात आला होता. त्यांना सरेंडर करायला सांगण्यात आले होते. तर यावेळी सर्वोच्च न्यायालायाने सांगितले की, सेटलवाड यांच्यावर चार्जशीच दाखल करण्यात आलेली आहे. तसेच कस्टडीमध्ये त्यांची चौकशी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना आता जामीन मिळणे गरजेचे आहे.

तसेच पुढे न्यायालाने सांगितले की, सेटलवाड यांना 2 सप्टेंबर 2022 पासून जामीनावर मानलं जाईल. तसेच त्या कोणत्याही साक्षादाराला प्रभावित करणार नाही. त्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केल्यास फिर्यादी त्यांच्याविरोदात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो असं देखील यावेळी न्यायालयाने सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube