Download App

आदिवासी शेतक-यांना विजपंप / तेलपंप पुरवठा करणे

Govt.Schemes : आदिवासी शेतक-यांना (Tribal farmers)त्यांचा शेतीविकास (Agricultural development)किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या साधनाचा व उर्जेचा पुरेपुर उपयोग करुन त्याद्वारे जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणून आदिवासींचा आर्थिक विकास (Economic development of tribals)साधण्याच्या हेतूने 100 टक्के अनुदानावर विजपंप (Electric pump) / तेलपंप (oil pump)पुरविण्यात येते.

Eknath Shinde : सरकार शेतकऱ्यांचे आहे, खचून जावू नका; नुकसान भरपाई देवू

योजनेच्या प्रमुख अटी :
• आदिवासी शेतक-यांना विजपंप मंजूर करतांना त्यांच्या शेतातील पाण्याचे साधन असलेल्या विहिर / नाल्यास कमीत कमी सहा महिने पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
• आदिवासी शेतकरी स्वत: जमीन कसत असावा.
• 60 आरपेक्षा कमी जमीन ज्यांच्या नावाने असेल अशा किंवा 3 लगतच्या जमीन धारकांना एकत्रित येऊन करार लिहुन दिला तर एकापेक्षा अधिक लाभधारक एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतील. मात्र अशा एकत्रित आलेल्या शेतक-यांची एकूण जमीन 60 आरपेक्षा जास्त असावी.
• या योजनेखाली ज्या गावात / शेतात विजपुरवठा केला जाऊ शकतो त्या गावच्या शेतक-यास विजपंप व जेथे वीजपुरवठा केला जात नाही अथवा 3 वर्षात केली जाण्याची शक्यता नाही, अशा ठिकाणी तेलपंप पुरविण्यात येतो.

आवश्यक कागदपत्रे :
▪ अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला.
▪ 7/12 उतारा.
▪ पाणी उपलब्ध असल्याचा भुजल सर्वेक्षण यंत्रणेचा दाखला व नदी नाल्याकरीता पाणी उपासण्याकरीता संबंधित सक्षम अधिका-याचे परवानगी पत्र.
▪ वीजपंपाकरीता महावितरणाचे आवश्यक सुसाध्यता दाखला.

लाभाचे स्वरूप असे : या योजनेखाली ज्या गांवात / शेतात विजपुरवठा केला जाऊ शकतो. त्या गावच्या शेतक-यास विजपंप व जेथे वीजपुरवठा केला जात नाही किंवा ३ वर्षात केली जाण्याची शक्यता नाही, अशा ठिकाणी तेलपंप पुरविण्यात येतो.

या ठिकाणी संपर्क साधावा :
▪ संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
▪ प्रादेशिक व्यवस्थापक / उपप्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us