Symptoms of Cataract : तुम्हाला पण अंधुक दृष्टी, दृश्यता कमी होणे, चकाकी यांसारख्या समस्या जाणवत आहेत का? या समस्यांमुळे रोजच्या आयुष्यातील सामान्य क्रिया जसे वाचन, लोकांना ओळखणे यांवर परिणाम होतो आहे का? जर तुम्ही या लक्षणांनी त्रस्त असाल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवे. कारण ही लक्षणे फक्त डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची नाही तर मोतीबिंदू सारख्या गंभीर आजाराचीही असू शकतात.
टीम इंडियापासून दुरावलेला ‘अमित’ थकला; तीन हॅट्रिक घेणाऱ्या फिरकीपटूचा क्रिकेटला गुडबाय
मोतीबिंदू (Cataract) म्हणजे डोळ्यांच्या सामान्यतः पारदर्शक स्फटिक कणांचा (लेन्स) ढगसदृश्य पुंजका होय. यात स्फटिक कणसमूह अतिशय महत्त्वाचा आहे कारण तो प्रकाश किरण डोळ्याच्या मागील बाजूस असलेल्या रेटिनावर, मज्जातंतूच्या थरावर केंद्रित होण्यावर परिणाम करतो. जेव्हा स्फटिक कण (लेन्स) लक्षणीयरित्या ढगसदृश्य एका ठिकाणी जमा होतात, तेव्हा ते प्रकाश किरणांचे केंद्रीकरण थांबवतात आणि दिसण्याची समस्या निर्माण करतात. म्हणूनच, या समस्येबद्दल (Cataract) मूलभूत जागरूकता आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्यामुळे दृष्टी गमावण्याचा धोका आपण वेळीच टाळू शकतो. म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून आपण मोतिबिंदूची प्रमुख लक्षणं, कारणं आणि उपाय (Cataract Prevention) जाणून घेणार आहोत.
मंत्री सावेंच्या मध्यस्थीला यश! 12 मागण्या मान्य झाल्यानंतर नागपूरमधील ओबीसींचं साखळी उपोषण मागे
डोळ्यांसमोर अंधार येणे किंवा अंधुक दिसणं.
प्रकाश (Light) किंवा बल्बची चमक जास्त जाणवणं.
रंग फिके किंवा धूसर दिसणं.
रात्री वाहन चालवताना अडचण येणे.
वाचन-लेखनात सतत धुंधळेपणा.
वारंवार चष्म्याचा नंबर बदलणं.
वाढते वय – 50 वर्षांनंतर धोका अधिक.
डायबेटिस – मधुमेहींमध्ये मोतिबिंदू लवकर विकसित होतो.
डोळ्यांना झालेली दुखापत किंवा सर्जरी.
जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश.
आनुवंशिकता – कुटुंबात असल्यास धोका जास्त.
आहारात व्हिटॅमिन A, C आणि E यांचा समावेश करा.
बाहेर जाताना सनग्लासेस वापरा.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
डायबिटीज नियंत्रणात ठेवा.
नियमित डोळ्यांची तपासणी (Cataract) करा.