टीम इंडियापासून दुरावलेला ‘अमित’ थकला; तीन हॅट्रिक घेणाऱ्या फिरकीपटूचा क्रिकेटला गुडबाय

टीम इंडियापासून दुरावलेला ‘अमित’ थकला; तीन हॅट्रिक घेणाऱ्या फिरकीपटूचा क्रिकेटला गुडबाय

Amit Mishra Retirement : टीम इंडियातून गायब झालेला लेग स्पिनर अमित मिश्राने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमित मिश्राने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृ्त्त होत असल्याची घोषणा केली आहे. अमितने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी 20 सामने खेळले. अमितला क्रिकेट खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. आज अमित मिश्राने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली. अमितने देशांतर्गत क्रिकेटपासून ते थेट आयपीएलपर्यंत मजल मारली. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांच्या हजेरीत त्याला जास्त संधी मिळालीच नाही.

अमित मिश्राच्या क्रिकेट कारकिर्दीवर (Amit Mishra Retirement) नजर टाकली तर त्याने एकूण 22 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 76 विकेट घेतल्या. अमितला 36 एकदिवसीय सामन्यांत संधी मिळाली. यात त्याने आपल्या फिरकीने 64 खेळाडूंना बाद केले. या व्यतिरिक्त 10 टी 20 सामन्यांतही संधी मिळाली. यात त्याने 16 विकेट्स घेतल्या. अमितने त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Team India) एकूण तीन वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.

विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठी मारहाण अन् उपाशी ठेवायचा; प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या बायकोचे गंभीर आरोप

अमितने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र मोठे योगदान दिले. खेळाडू म्हणून त्याने एकूण 152 प्रथम श्रेणी सामन्यांत 535 विकेट्स घेतल्या. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 252 आणि टी 20 मध्ये 285 विकेट्स आहेत. मिश्राने त्याच्या प्रोफेशनल करिअरमध्ये एकूण 1072 विकेट घेतल्या आहेत. इतकेच नाही तर त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतक देखील केले. 4176 धावा त्याच्या नावावर आहेत.

आयपीएलमध्येही अमितचा जलवा 

आयपीएलमध्ये देखील अमित मिश्राने चमकदार कामगिरी केली आहे. अमितने दिल्ली, लखनऊ, हैद्राबाद या संघांकडून सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याने एकूण 174 विकेट्स घेतल्या आहेत. अमितने आयपीएलमध्ये तीन वेळेस हॅट्रिक घेण्याचीही कामगिरी केली आहे. मिश्राचा इकॉनॉमी रेट फक्त 7.37 इतका राहिला. अमितने आयपीएलचे एकूण 15 सिझन खेळले येथे त्याने 36 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

ब्रेकिंग! टीम इंडियाची भिंत कोसळली, चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती; 20 वर्षांची कारकिर्द

follow us
  • fb
  • instagram
  • youtube