ब्रेकिंग! टीम इंडियाची भिंत कोसळली, चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती; 20 वर्षांची कारकिर्द

ब्रेकिंग! टीम इंडियाची भिंत कोसळली, चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती; 20 वर्षांची कारकिर्द

Cheteshwar Pujara Retirement : क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा (Team India) कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. चेतेश्वर पुजाराची कारकिर्द जवळपास वीस वर्षांची होती. या वीस वर्षांत पुजाराने 13 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यतीत केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सन 2005 मध्ये पुजाराने पहिला सामना खेळला होता. हा सामना सौराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात होता. पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अखेरचा सामना फेब्रुवारी 2025 गुजरात विरुद्ध खेळला होता.

सन 2010 मध्ये पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बंगळुरूत ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. हा सामना कसोटीतील होता. यानंतर सन 2013 मध्ये बुलावायो येथे झिम्बाम्बे विरुद्धच्या सामन्यातून पुजाराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुजाराला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाली नाही. परंतु, त्याचं नशीब कसोटीतच चमकलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cheteshwar Pujara (@cheteshwar_pujara)

पुजाराच्या बाबतीत खास योगायोग

मागील 13 वर्षांपासून पुजारा कसोटीत भारतीय संघाचा हुकूमी एक्का होता. सलामीलाच येऊन तो अगदी चिवट फलंदाी करायचा. संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात पुजाराचे नेहमीच योगदान असायचे. पुजाराने त्याचा अखेरचा कसोटी सामना देखील जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच खेळला होता. हा पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीतील खास योगायोगच म्हणावा लागेल.

WTC Final : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने शुबमन अन् पुजाराला चकवले, बॉल सोडण्याच्या नादात गमावली विकेट, पहा व्हिडिओ

क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती पुजाराने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. भारताची जर्सी परिधान करणे, देशाचं राष्ट्रगीत म्हणणं, मैदानात उतरल्यानंतर सर्वोत्तर कामगिरी करण्याचे उद्दीष्ट या गोष्टी शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या सगळ्या माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. परंतु, प्रत्येक चांगल्या गोष्टीला कुठेतरी शेवट असतो. त्यानुसार आता मी क्रिकेटमधील सर्व प्रकारांतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

पुजाराचे क्रिकेट करिअर

चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट करिअरबद्दल बोलायचं झालं तर पुजारा एकूण वीस वर्षे या क्षेत्रात वावरत होता. या 20 वर्षांच्या कारकिर्दित त्याने 278 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने, 130 लिस्ट ए सामने आणि 71 टी 20 सामने खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुजाराने एकूण 21 हजार 301 धावा केल्या. यात 66 शतकांचा समावेश आहे. लिस्ट ए सामन्यात 16 शतकांसह पुजाराने 5 हजार 759 धावा केल्या. तर टी20 सामन्यात 1 शतकासह 1556 धावा पुजाराने केल्या आहेत.

पुजाराने एकूण 103 कसोटी आणि फक्त 5 वनडे सामने खेळले. या एकूण 108 सामन्यांत त्याने 7 हजार 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 19 शतके पुजाराच्या नावावर आहेत. 206 नाबाद हा त्याचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube