WTC Final : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने शुबमन अन् पुजाराला चकवले, बॉल सोडण्याच्या नादात गमावली विकेट, पहा व्हिडिओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल (Shubhamn Gill) अवघ्या 13 धावा करून बाद झाला. टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात बॅकफूटवर आहे. 112 धावांवर भारताने 4 विकेट गमावल्या. सलामीवीर शुभमन काही विशेष करू शकला नाही. बोलंडने (Scott Boland) शुभमनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच पुजाराला (Cheteshwar Pujara) कॅमरुन ग्रीन ( Cameron Green) ने बाद केले. गिल आणि पुजारा यांनी आपली विकेट बॉल सोडण्याच्या नादात गमावली. (WTC Final : ind-vs-aus-final-shubman-gill-out-by-scott-boland-world-test-championship-final)
भारताच्या पहिल्या डावात गिल कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आला होता. यादरम्यान तो 15 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 13 धावा करून बाद झाला. बोलंडने गिलला क्लीन बोल्ड केले. 7व्या षटकातील चौथा चेंडू गिलला समजू शकला नाही आणि तो बाद झाला. असेच काही पुजारासोबत झाले त्याने बॅट वर करताच चेंडू स्टंपवर जाऊन आदळला. हे दोन्ही व्हिडिओ ICC ने ट्विटरवर शेअर केले आहेत.
Erri pappa #ShubmanGill #WTCFinal pic.twitter.com/5E4LkAlIX5
— Ravi Teja (@raviteja003) June 8, 2023
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सुरुवात खराब झाली होती. गिलच्या आधी 15 धावा करून कर्णधार रोहित बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजाराही चालायला लागला. त्याने 25 चेंडूत 14 धावा केल्या. विराट कोहली 31 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी शतके झळकावली होती. हेडने 174 चेंडूत 163 धावा केल्या. स्मिथने 121 धावांचे योगदान दिले. यादरम्यान भारताकडून मोहम्मद सिराजने 4 बळी घेतले.
शुभमन गिलचा कसोटी रेकॉर्ड चांगला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये 903 धावा केल्या आहेत. गिलने या फॉरमॅटमध्ये 2 शतके आणि 4 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 128 धावा आहे. त्याने 24 वनडे सामन्यांमध्ये 1311 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने एक द्विशतक आणि 4 शतके झळकावली आहेत.