विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठी मारहाण अन् उपाशी ठेवायचा; प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या बायकोचे गंभीर आरोप

विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठी मारहाण अन् उपाशी ठेवायचा; प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या बायकोचे गंभीर आरोप

Kanpur Former Cricketer Amit Mishras Wife Serious Allegations :  मोहम्मद शमीनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्रा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला आहे. टीम इंडियाचा (Cricket) अनुभवी लेग स्पिनर आणि आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अमित मिश्रा (Amit Mishra) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी त्याचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलंय. त्यांच्या पत्नी गरिमा मिश्रा यांनी त्यांच्यावर मारहाण, मानसिक छळ आणि अवैध संबंधांचे गंभीर आरोप केले आहेत. गरिमा यांनी (Amit Mishras Wife Serious Allegation) कानपूर पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली.

गरिमा यांनी आरोप केलाय की, लग्नापासूनच हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. पतीचे इतर महिलांशी असलेले संबंध यामुळे मानसिक ताणतणाव सहन करावा लागत होता. दुसरीकडे, अमित मिश्रा यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटलंय. सध्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

खळबळजनक ! बीडमध्ये तरूणीने स्वत:च्या लग्नाच्या दिवशीच मामाच्या घरात घेतला गळफास, धक्कादायक कारण…

कानपूरमध्ये, राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळणारे माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर अमित मिश्रा यांची पत्नी गरिमा हिने त्यांच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. गरिमाच्या म्हणण्यानुसार, अमित आणि त्याच्या कुटुंबाने होंडा सिटी कार आणि 10 लाख रुपयांसाठी तिला त्रास दिला. तसेच, तिने आरोप केला आहे की, तिच्या पतीचे इतर महिलांशीही संबंध आहेत.

शुक्रवारी दुपारी ती तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस आयुक्त अखिल कुमार यांच्या कार्यालयात पोहोचली होती. पोलीस आयुक्तांनी चौकशीनंतर कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्याच वेळी, किडवाई नगर आरबीआय कॉलनीतील रहिवासी अमित मिश्रा यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्याची पत्नी त्याचा छळ करत असल्याचे सांगितले. काही काळापूर्वी तिने त्याला बँक ऑफिसबाहेर मारहाण केली होती.

भेसळयुक्त पनीर प्रकरणी सरकारचं मोठं पाऊल; आमदार पाचपुतेंच्या लढ्याला यश

अमित मिश्रा म्हणाले की, त्यांची पत्नी स्वतः त्यांच्यावर अत्याचार करत आहे. अमितचे लग्न 26 एप्रिल 2021 रोजी गरिमाशी झाले होते. सध्या तो क्रिकेट सामन्यांपासून दूर आहे. कानपूरमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करतो. पतीने तिला अनेक वेळा मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याला अनेक वेळा उपाशी राहावे लागले. पतीचे इतर महिलांशी संबंध आहेत. तिने याचा विरोध केला, तेव्हा अमितने तिला चार महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये घराबाहेर हाकलून लावले. तेव्हापासून ती तिच्या पालकांच्या घरी राहत आहे. अमित मिश्रा यांनी सांगितले की, त्यांची पत्नी स्वतः त्यांना त्रास देत आहे. यापूर्वी तिने बँक ऑफिसबाहेर त्याच्यावर हल्ला केला होता.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube