Suhas Kande : राजीनामा, अजित पवार अन् ईडी… समीर भुजबळ-सुहास कांदेंमध्ये पुन्हा जुंपली

Suhas Kande : राजीनामा, अजित पवार अन् ईडी… समीर भुजबळ-सुहास कांदेंमध्ये पुन्हा जुंपली

Suhas Kande Criticized Sameer Bhujbal Resignation : समीर भुजबळांनी (Sameer Bhujbal) विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीने सुहास कांदे यांना रिंगणात उतरवलं होतं. महाविकास आघाडीकडून गणेश धात्रक रिंगणात होते, या लढतीमध्ये सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना पराभवाची धूळ चारली होती. तेव्हापासून दोघांमध्ये तीव्र संघर्ष दिसून येतोय. आता पुन्हा एकदा भुजबळांच्या राजीनाम्यावरून कांदेंनी (Suhas Kande) हल्लाबोल केलाय.

मी राजीनामा दिला होता, पण तो स्वीकारला नाही, असं समीर भुजबळांनी म्हटलंय. समीर भुजबळ यांची हकालपट्टी केल्याचं अजित पवार (NCP) यांनी सांगितलं, असं सुहास कांदे म्हणाले आहेत. ईडी आणि सीबीआयपासून वाचण्यासाठी समीर भुजबळ हे अजित पवारांच्या (Maharashtra Politics) पुढे-पुढे करत आहेत. असंही सुहास कांदे म्हणाले आहेत.

मोठी बातमी! तुम्ही जिथं निष्ठेने राहता तिथं योग्य…थोपटेंचा काँग्रेसला रामराम..पुढील निर्णयही घेतला

समीर भुजबळ अन् सुहास कांदे (Mahayuti) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच समीर भुजबळांनी सुहास कांदेंच्या या उत्तराला प्रत्युत्तर दिलंय. राजीनामा मी दिला होता. परंतु अजून तो स्वीकारला गेलेला नाही. म्हणून मी अजून पक्षातच आहे. निवडणुकीनंतर देखील अनेक ठिकाणी पक्षाचे कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमांमध्ये मी होतो. मुंबई अध्यक्षपदाचा निर्य प्रदेशाध्यक्ष घेतली, असं देखील समीर भुजबळांनी स्पष्ट केलंय.

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हा ढगफुटीने हादरला; तीन जणांचा मृत्यू, प्रशासनाकडून मदतकायर्य सुरू

तर पक्षात घेतलेलं देखील नाही अन् त्याला पक्षात घेणार सुद्धा नाही, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्यावेळी तक्रार केली होती. त्यावेळी माझ्यासमोर अजितदादांना त्यांनी विचारलं होतं. त्यावेळी अजितदादांनी सांगितलं होतं की, मी त्याची पक्षामधून हकालपट्टी केलेली आहे. त्याने दिलेले राजीनामे स्वीकारलेले आहेत. त्यांना स्वीकारण्याची महायुतीने कोणतीही पॉलिसी स्वीकारलेली नाही.

समीर भुजबळ हा हकाललेला प्राणी आहे. तो बळजबरीने भ्रष्टाचार करून मिळवलेल्या ज्या काही जमिनी असतील, जुमले असतील, ते वाचविण्यासाठी असे प्रकार होत असल्याची टीका सुहास कांदे यांनी म्हटलेलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube