“भुजबळांचं वाईट होतं तेव्हा मी खूश असतो”, कट्टर विरोधकाचा टोला; अजितदादांंचीही घेतली भेट
MLA Suhas Kande on Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने भुजबळ कमालीचे संतापले आहेत. त्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत बोलूनही दाखवली आहे. यानंतर आता छगन भुजबळांचे कट्टर राजकीय विरोधक आणि नांदगाव मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक टीका केली आहे. भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी नेहमीच खूश असतो असे कांदे म्हणाले आहेत. दरम्यान, सुहास कांदे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“अजितदादांची काय चूक, भुजबळांनी सांगावं”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं सूचक वक्तव्य
पत्रकारांनी कांदेंना आज तुम्ही खुश दिसत आहात असे विचारले. त्यावर कांदे म्हणाले, मी अजित पवार यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. जेव्हा भुजबळांचं वाईट होतं तेव्ही मी नेहमीच खुश असतो. भुजबळांनी केलेल्या वाईट कृत्यांचं जेव्हा त्यांना फळ मिळते तेव्हा मला आनंद होतो. छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर आता ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी असाच सूर आळवला होता. यावर कांदेंना विचारले असता ते म्हणाले, त्यांच्यात वेगळे होण्याची हिंमत नाही. त्यांना आव्हान देतो की त्यांनी वेगळं होऊनच दाखवावं.
भुजबळ नेमकं काय म्हणाले?
उपस्थितांना संबोधित करताना भुजबळ म्हणाले की, ही लढाई मी आमदार म्हणूनच सभागृहामध्ये लढणार असून, तिथे कितीही बंधने असली तरी रास्ता तो मेरा है, असा थेट भुजबळांनी अजितदादांचे नाव न घेता दिला आहे. यावेळी नाशिक लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) माझं नाव घेतलं होतं. मात्र, माझ्या विरोधात मिटिंगा झाल्या अशा खळबळजनक खुलासादेखील भुजबळांनी यावेळी केला.
महायुतीत काडी पडलीच! मला पैशांची ऑफर अन् धमक्या..; आ. कांदेंचे भुजबळांवर गंभीर आरोप
मला अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत. आमचा तालुका, जिल्हा, राज्यात या असं सांगत आहेत. लासलगावमध्ये आपलं कोणीतरी गेल्यासारखी अवकळा पसरली आहे. आपल्याला पेटून उठवायचं आहे, पण पेटायचं नाही. निषेध करताना आपल्याला संयम पाळायचा आहे असं आवाहन छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये केलं आहे. यावेळी त्यांनी कोणताही निर्णय घाईघाईत घेणार नसून, घाईघाईने कोणतेही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे तुमची साथ मला हवी आहे असे आवाहन भुजबळांनी उपस्थितांना केले. यापुढे आणखी संकटे येतील असे सांगत त्यासाठी पुन्हा एकदा ओबीसी एल्गार पुकारावा लागेल असे भुजबळ म्हणाले.