Download App

होळीत रंग खेळताना अशा पद्धतीने घ्या केसांची काळजी

मुंबई : बहुतेक लोकांना होळी खेळायला आवडते, परंतु त्वचा आणि केस खराब होण्याच्या भीतीने लोक होळी खेळणे टाळतात. रंगांमुळे केसांचे खूप नुकसान होते. जर तुम्हाला होळी खेळायला आवडत असेल आणि तुमचे केस खराब होण्याच्या भीतीने खेळणे टाळत असाल तर काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सुचवणार आहेत ज्यांच्या साह्याने तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता.

ऑलिव्ह किंवा एरंडेल तेल : रंग खेळण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी केसांना एरंडेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावा. तेल केसांवर संरक्षणात्मक थर तयार करेल. त्यामुळे केस धुतल्यानंतर रंग सहज निघतो. जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑईल किंवा एरंडेल तेल नसेल तर तुम्ही नारळ किंवा बदामाचे तेल वापरू शकता. होळी खेळण्याच्या एक रात्री आधी केसांना तेलाची मालिश करता येते.

दही : होळी खेळल्यानंतर लगेच केस धुणे टाळा. शॅम्पूच्या किमान ४५ मिनिटे आधी केसांना दही लावा. हे रंग काढून टाकण्यास आणि केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते.

‘या’ गोऱ्या गोमट्या खेळाडूवर खिळल्या नजरा, कोण आहे ‘ही’ भारतीयांची नवीन क्रश?

मोहरीचे तेल : होळी खेळण्यापूर्वी तुम्ही आजीचे आवडते मोहरीचे तेल वापरू शकता. या तेलाच्या मदतीने चांगले मसाज करा आणि होळी खेळल्यानंतर केसांना शॅम्पू करा.

‘रेस्ट ऑफ इंडियाने’ मध्य प्रदेशचा पराभव करून इराणी चषक जिंकला

नारळाचे दूध : केसांवर नारळाचे दूध लावणे हा होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण करण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे रंग सहजपणे काढून टाकण्यास देखील मदत करते. खेळण्यापूर्वी केसांना नारळाचे दूध लावा. तसेच शॅम्पूपूर्वी लावा आणि तासभर राहू द्या. नंतर शॅम्पूने स्वच्छ करा.

Tags

follow us