Download App

Tata Altroz Racer भारतात लाँच, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त 9.49 लाख

Tata Altroz Racer : आज भारतीय बाजारात टाटा मोटर्सने आपली नवीन स्पोर्टी हॅचबॅक कार Tata Altroz Racer लाँच केली आहे. कंपनीने या नवीन स्पोर्टी

Tata Altroz Racer : आज भारतीय बाजारात टाटा मोटर्सने आपली नवीन स्पोर्टी हॅचबॅक कार Tata Altroz Racer लाँच केली आहे. कंपनीने या नवीन स्पोर्टी हॅचबॅक कारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त फीचर्ससह दमदार इंजिन देखील दिले आहे. ग्राहकांना या कारमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह 360 डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स सारखे जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. भारतीय बाजारात ही कार Hyundai i20 N Line ला टक्कर देणार आहे.

Tata Altroz ​​Racer किंमत

कंपनीने Tata Altroz ​​Racer R1 व्हेरिएंटची पेट्रोल मॅन्युअल इंजिन-ट्रांसमिशनची एक्स शोरुम किंमत 9,49,000 रुपये ठेवली आहे तर Altroz ​​R2 व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 10,49,000 रुपये ठेवण्यात आली आहे तर टॉप व्हेरियंट R3 ची एक्स-शोरूम किंमत 10,99,000 रुपये आहे.

Tata Altroz ​​Racer फीचर्स

Tata Altroz ​​Racer मध्ये कंपनीकडून R16 अलॉय व्हील, व्हॉईस असिस्टसह इलेक्ट्रिक सनरूफ, iRA कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, 6 एअरबॅग, वायरलेस चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, लेदरेट सीट्स, 7-इंचाचे TFT डिजिटल क्लस्टर, एअर प्युरिफायर, 10.25 15-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड क्लस्टर कंट्रोल्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, 360 डिग्री कॅमेरा, पॅसिव्ह एंट्री पॅसिव्ह स्टार्ट सिस्टम, एक्सप्रेस कूल, रीअर आर्मरेस्ट, रीअर वायपर्स आणि वॉश, 4 स्पीकर्ससह 4 ट्वीटर, FATC, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, फ्रंट फॉग लॅप्स, रिअर डिफॉगर, फ्रंट स्लाइडिंग आर्मरेस्ट, पॉवर विंडो, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि ऑटो फोल्ड आउट रिअर व्ह्यू मिरर, क्रूझ कंट्रोल, हाईट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर एसी व्हेंट्स, ऑटो हेडलॅम्प्स आणि रेन सेन्सिंग वायपर सारखी जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहे.

इम्रान खानची मजा! तुरुंगात मिळत आहे ‘ही’ सुविधा

Tata Altroz ​​Racer इंजिन आणि पॉवर

Tata Altroz ​​Racer मध्ये कंपनीने 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे जे जास्तीत जास्त 120 पीएस पॉवर आणि 170 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते तसेच या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले आहे. याच बरोबर कंपनीने दावा केला आहे की, अल्ट्रोज रेसर पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत खूप पॉवरफुल आणि स्पेशल असणार आहे.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज