Download App

TISS मध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला ७५ हजार रुपये मिळणार पगार

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे तुमचीनोकरी करण्याची इच्छा असेल तर एक आनंदाची बातमी आहे. TISS मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

TISS Mumbai Bharti 2024: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (Tata Institute of Social Sciences) ही सामाजिक आणि संशोधन क्षेत्रातील एक महत्वाची संस्था आहे. या संस्थेत नोकरी (Job) करण्याचं अनेकाचं स्वप्न असतं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई येथे तुमचीही नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. TISS मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? निवड कशी होणार? याच विषयी जाणून घेऊ.

‘प्रादेशिक पक्षांना काँग्रेस हाच पर्याय’; शरद पवारांच्या भाकीतावर नाना पटोलेंचं मोठं विधान 

पात्र आणि इच्छुक उमेदवार tiss.edu या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

रिक्त पदांचा तपशील –
ही भरती प्रक्रिया ‘वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक’ (Senior Project Manager) पदाच्या विविध रिक्त जागांसाठी आयोजित केली जाते.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचं अजिबातचं टेन्शन नाहीये. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल.
तुम्हाला tiss.edu या साईटवर भरती प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती सहज मिळू शकते.

शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती तंत्रज्ञान (IT) किंवा संगणक अनुप्रयोगाच्या पसंतीच्या क्षेत्रात किमान 2 वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे.

Gautami Patil: सबसे कातिल ‘गौतमी पाटील’ दिसणार डान्सबार गर्लच्या भूमिकेत, ‘द महाराष्ट्र फाईल्स’ लवकरच 

पगार –
भरती प्रक्रियेत निवडलेल्या उमेदवारांना 70,000 ते 75,000 रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया –
अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड वॉक-इन मुलाखतीद्वारे केली जाईल. दुपारी २ ते ४ या वेळेत वॉक-इन मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणं गरजेचं आहे.

पत्ता – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस – स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, स्किल सेंटर, न्यू कॅम्पस, फार्म रोड, देवनार, मुंबई.

अधिसूचना – https://tiss.edu/uploads/files/Advetisement_Sr._Project_Mgr_may_2024_NU0y9da.pdf

follow us