Download App

आता कुठे जायचे कशाला ?, फोनमधूनच द्या अंगठा; फिंगरप्रिंटसाठी तयार होतेय ‘ही’ खास प्रणाली

UIDAI Partners With IIT Bombay : सध्या मोबाइलद्वारे फेस ऑथिंटिकेशन करता येते मात्र फिंगरप्रिंट ऑथिंटिकेशन करायचे असेल तर तशी सुविधा मिळत नाही. त्यासाठी जवळच्या सायबर कॅफे किंवा ई सेवा केंद्राचा रस्ता धरावा लागतो. आता मात्र ही अडचणही लवकरच दूर होणार आहे. टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर सिस्टीम घरातूनच फिंगरप्रिंट प्रमाणीकरण करून देऊ शकते. यासाठी भारतीय युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटीने (UIDAI) भारतीय तंत्रज्ञान संस्था बॉम्बे (IIT Bombay) बरोबर भागीदारी केली आहे. यामुळे लवकरच ही प्रणाली वापरासाठी उपलब्ध होऊ शकते.

महाविकास आघाडी फुटण्याच्या चर्चांना उधाण, पटोलेंचा पुन्हा एकदा दिल्ली दौरा

यानंतर आता या दोन्ही संस्थ फिंगरप्रिंट प्रमाणीकरणासाठी मोबाइल कॅप्चर सिस्टीम आणि कॅप्चर सिस्टमसह एकत्रित केलेले खास मॉडेल विकसित करण्यासाठी काम करत आहे. जर ही प्रणाली तयार झाली तर फिंगरप्रिंट ऑथिंटिकेशनसाठी कुठेही जाण्याची गरज राहणार नाही. आधारकार्ड किंवा अन्य महत्वाच्या कामांसाठी फोनद्वारेच फिंगरप्रिंट ऑथिंटिकेशन होणार आहे. यासाठी अनेक इंजिनिअर काम करत आहेत.

जी नवीन सिस्टीम लवकरच अस्तित्वात येणार आहे ती एकाच वेळी अनेक फिंगरप्रिंट कॅप्चर करण्यास सक्षम असेल. या प्रणालीमध्ये सिग्नल किवा इमेज प्रोसेसिंग, मशीन लर्निंगवर जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे. ज्याद्वारे अगदी साध्या फोनद्वारेही फिंगरप्रिंट प्रमाणीकरण करणे शक्य होऊ शकेल.

अजित पवारांनी आमचे 40 आमदार पाडण्याची तयारी केली होती; शहाजी बापूंचा दावा

ही प्रणाली विकसित झाल्यानंतर फिंगरप्रिंट प्रमाणीकरणासाठी लोकांना सायबर कॅफे किंवा ई सेवा केंद्रात जाण्याची गरज राहणार नाही. महत्वाची कामे सुद्धा खोळंबणार नाहीत. सध्या बऱ्याच सरकारी आणि खासगी कामांसाठी फिंगरप्रिंट घेतले जाते. हे काम आता फोनद्वारेच होणार असल्याने त्यासाठी  वेगळी खटपट करावा लागणार नाही.

 

Tags

follow us