महाविकास आघाडी फुटण्याच्या चर्चांना उधाण, पटोलेंचा पुन्हा एकदा दिल्ली दौरा
Nana Patole Delhi Tour : महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याच्या चर्चांना उधाण येत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. नाना पटोले काँग्रेसविषयी महाविकास आघाडीत सुरु असलेल्या मतमतांतरावर चर्चा करणार असल्याचं माहिती समजतेयं.
‘राष्ट्रवादी आमच्याबरोबर यायला एका पायावर तयार’ ; शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ !
एकीकडे काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुंबईत येणार आहेत. तर दुसरीकडे नाना पटोलेंचा दिल्ली दौरा असणार आहे. मागील काही दिवसांत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि उद्योजक गौतमी अदानी यांच्याबाबत काँग्रेसशी साम्य असलेली भूमिका महाविकास आघाडीच्या घेतली नसल्याचं दिसून आलं.
तसेच काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात सिल्वर ओकवर चर्चा रंगली. या चर्चेत काँग्रेसचे नेते सामिल नव्हते. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या वज्रमूठ सभेला नाना पटोलेंनी प्रकृतीचं कारण पुढे करत दांडी मारल्याचं दिसून आलं. त्यावेळीही विविध चर्चांना उधाण आलं होतं.
त्यानंतर मी ठणठणीत असून दुसऱ्याची प्रकृती बिघडवणार, असं विधान पटोलेंनी केलं होतं. तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळेंनी याआधी केलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसची कोंडी होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसताहेत.
दिल्ली दौऱ्यात नाना पटोले या संपूर्ण घडामोंडींवर पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, आगामी काळात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा पार पडणार आहेत. त्याबाबतही चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.
पंकजा मुंडे पाथर्डीतून विधानसभा लढणार ? पंकजा काय म्हणाल्या…
यासोबतच काही काँग्रेसच्या नेत्यांमध्येही मतभेद असल्याचं नूकतंच समोर आलं होतं. काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंविरोधात खोके घेतल्यांसंदर्भात वक्तव्य केलं होतं. देशमुख यांच्या या विधानानंतर अनेक दिवस त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती, मात्र, नूकतीच त्यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलीय.
दरम्यान, सावरकर, गौतम अदानी ही दोन मुद्दे आणि सिल्वर ओकच्या बैठकीनंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष राहणार का? की स्वबळावर निवडणुका लढवणार? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.