Shiv Thakare : लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरेची छोट्या पडद्यावर एंट्री; ‘या’ शोमध्ये झळकणार दमदार भूमिकेत

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 30T150303.187

Shiv Thakare : ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वात फिनालेपर्यंत पोहोचलेले अर्चना गौतम (archana gautam) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare), तसेच सुंबूल लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. शो संपल्यावर लवकरच दोन महिन्यांनी हे तिघेही एकत्र एकाच शोमध्ये चाहत्यांना दिसणार आहे. यासंदर्भात रुबीना दिलैकने एक इस्टाग्राम पोस्ट (Instagram post) शेअर केली आहे. रुबीना दिलैकने (Rubina Dilaik) इंस्टाग्रामवर ३ फोटो पोस्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)


पहिल्या फोटोमध्ये ती हर्ष लिंबाचिया, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशबरोबर दिसत आहे. भारती सिंगचा पती या तिघांवर लक्ष ठेवून आहे. याबरोबरच हे सर्वजण काही ना काही टास्क करत असल्याचे देखील दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत रुबीना सोफ्याच्या हँडलवर बसली आहे. तिथे तिच्या डाव्या बाजूला अर्चना गौतम आणि शिव ठाकरे उभे असल्याचे दिसत आहे. तर उजवीकडे हर्ष लिंबाचिया आणि पुनित पाठक हे दोघेही वाद घालत असल्याचे दिसत आहे.

तिसऱ्या फोटोत रुबीना दिलैकचा एक हात पुनीत पाठक आणि दुसरा हात अर्जुन बिजलानीने पकडला आहे. तिघेही जोरदार हसत आहेत. हर्ष लिंबाचिया आणि सुंबुल तौकीर खान धक्कादायक प्रतिक्रिया देत आहेत. तर शिव ठाकरे आणि अर्चना गौतम तोंड पाडून उभे असलयाचे फोटोत दिसत आहेत. या फोटोंबरोबर रुबिनाने कॅप्शन देखील लिहून याबद्दल माहिती दिली.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

रुबीना दिलैकने कॅप्शनमध्ये असे लिहिलंय की, ही टॉर्चरची वेळ आहे. (हास्य आणि विनोदांसह.) हाऊसफुल बे-बी सोमवार ते रविवार म्हणजे ७ दिवस रात्री १० वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या शोचे नाव ‘एंटरटेनमेंट की रात हाऊसफुल’ असं असणार आहे. ज्यामध्ये सेलेब्स येणार आणि त्यांच्याबरोबर काही मजेदार टास्क केले जाणार आहेत.

हा शो १५ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, बिग बॉस संपल्यावर शिव ठाकरे, सुंबूल तौकीर खान आणि अर्चना गौतम तिघेही एकत्र दिसणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये या शोविषयी मोठी उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube