‘राष्ट्रवादी आमच्याबरोबर यायला एका पायावर तयार’ ; शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ !

‘राष्ट्रवादी आमच्याबरोबर यायला एका पायावर तयार’ ;  शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ !

Sanjay Shirsat : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कारण, काही दिवसांपासून शरद पवार जी काही वक्तव्ये करत आहेत त्यावरून महाविकास आघाडी टिकणार की नाही अशी चर्चा नव्याने सुरू झाली आहे. त्यात आता ही भेट झाल्याने राज्यात नवी समीकरणे तयार होतात का असेही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या प्रकरणात आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Narhari Zirwal : पांढरा सदरा, गांधी टोपी आणि हिरवं लुगडं; जपान दौऱ्यापूर्वीचा झिरवळांचा लूक चर्चेत

शिरसाट म्हणाले, ‘आता राष्ट्रवादी सुद्धा आमच्यात यायला उडी मारायला एका पायावर तयार आहे. उद्धव साहेबांना सगळे सोडून जात आहेत, वाईट आहे. अजित पवार काहीही करू शकतात, कुठेही जाऊ शकतात. मला तर वाटते एनसीपीने टाकलेलली ही गुगली आहे. याचा खरा अर्थ शिवसेनेची साथ सोडण्याची यांची तयारी सुरू असल्याचे दिसते. उरलेले अनेक आमदार लवकरच आमच्यात दिसतील’, असे वक्तव्य शिरसाट यांनी केले.

‘नरेंद्र मोदी, अमित शहा मातोश्रीवर यायचे. पण उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर गेले. ही खरी विचारांशी प्रतारणा आहे. संजय राऊतने त्यांना तिथे घेऊन जाण्याचे काम केले म्हणून आधी यांना पहिली लाथ मारावी. मातोश्रीची प्रतिष्ठा धुळीला मिळवली.’ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंबरोबरील बैठकीत शिजलं काय ? ; पवार म्हणाले, काही मुद्द्यांवर मतं वेगळी..

दरम्यान, गौतम अदानींच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले होते. त्यामुळे महाविकास टिकणार की नाही अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. आघाडी टिकणार नाही असा दावा भाजपकडूनही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube