पंकजा मुंडे पाथर्डीतून विधानसभा लढणार ? पंकजा काय म्हणाल्या…
Pankaja Munde On Pathardi Constituency: भाजप नेत्या पंकजा मुंडे या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे नारळी सप्ताहासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एक मोठे राजकीय विधान केले आहे. राज्यात आठ-दहा मतदारसंघ आहेत. तेथून लोक मला विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगतात. त्यात पाथर्डी हा एक मतदारसंघ आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
नामदेव शास्त्री व पंकजा मुंडेंची मने जुळली ! पंकजा आणि माझे वैर…
मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा आहे. राज्यातील आठ-दहा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणहून मी विधानसभा लढवावी, अशी गळ लोक घालतात. ती लोकांची भूमिका राहिला आहे. त्यात पाथर्डी एक मतदारसंघ आहे. परंतु पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडले, असे ही मुंडे म्हणाल्या आहेत.
राष्ट्रीय पक्ष दर्जा गेल्याचा मविआला फटका बसणार का? पाहा जयंत पाटील काय म्हणाले…
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी अनेकदा मुंडे समर्थकांनी केलेली आहे. तर या मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी अनेकदा मुंडेंसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखविली आहे.
हा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा मतदार आहे. मुंडे सांगितील त्यांना येथील मतदार निवडून देत असतो.
तर भारजवाडी येथील सप्ताहाच्या कार्यक्रमात भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी ही पंकजा मुंडेंना काही सल्ले दिले. तर पंकजा मुंडे आणि माझी वैर नाही. ती माझी मुलगी आहे, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. तर पंकजा मुंडे यांनीही मी भगवानगडाची पायरी असल्याचे विधान केले आहे. या दोन्ही विधानामुळे वेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.