Download App

Video : इंटरनेट चालू ठेऊनच फोन करताय? मग, नक्कीच धोका सावध व्हा, सरकारनेही दिला इशारा

मोबाइलवरुन एखाद्याला कॉल करताना इंटरनेट चालू ठेवल्याने धोका वाढू शकतो. सरकारने याबाबत इशारा दिला आहे.

Mobile Tips : मोबाइल रोजच्या जीवनाचा एक भाग झालाय. साध्या फोन्सची जागा स्मार्टफोनने घेतलीय. कुणाला (Mobile Tips) साधा फोन करायचा असो किंवा इंटरनेटच्या विश्वात वावरायचं असो प्रत्येक काम स्मार्टफोनवरच होतंय. पण यात एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीय का.. तुम्ही तुमच्या मोबाइलवरून एखाद्याला फोन करता, त्याच्याशी बोलता त्यावेळी बऱ्याचदा तुमच्या फोनमधील इंटरनेट चालूच (Internet) असतं. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? पण थांबा इतकं हलक्यात घेऊ नका. खरा धोका इथेच आहे. कॉल करताना इंटरनेट चालू ठेवल्याने धोका वाढू शकतो. सरकारने याबाबत इशारा दिला आहे. हा नेमका काय प्रकार आहे? यातून कोणता धोका निर्माण होऊ शकतो? याची उत्तरं मिळवू या..

Cyber Dost च्या माध्यमातून सरकार सायबर सेफ्टी आणि सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात जनजागृती करण्याचं काम करतं. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सायबर दोस्त काम करते. आता सायबर दोस्तच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की कोणत्याही परिस्थितीत कॉलिंग दरम्यान फोनमधील इंटरनेट चालू ठेऊ नका. गुगल क्रोमच्या सेटिंग्समध्ये जाऊन मोबाइलचा मायक्रोफोन चालू आहे की बंद याची माहिती कशी घेता येईल हे देखील या व्हिडिओत दाखवलं आहे.

आयफोन वापरकर्त्यांची वाढली अडचण! ‘या’ मॉडेल्सवर युट्यूब चालणार नाही, लिस्ट वाचा

सावध व्हा अन् चुका टाळा

जर मोबाइलवरून एखाद्याला कॉल केला याच दरम्यान जर मोबाइलमधील इंटरनेट कनेक्शन सुरुच असेल तर अॅप्स लोकांचे बोलणे गुपचूप ऐकू शकतात अशी माहिती एक पोलीस अधिकारी या व्हिडिओत देताना दिसत आहे. ही चूक मोबाइल युजर्सच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच धोकादायक ठरू शकते. यात एक प्रश्न असा आहे की मोबाइलमधील अॅप बोलणे कसे ऐकू शकतात? जर असं असेल तर मग हा प्रकार बंद करण्याचा मार्ग कोणता? याही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या..

खरंतर ज्यावेळी आपण मोबाइलमध्ये एखादे अॅप डाऊनलोड करतो. त्याचवेळी संबंधित अॅप तुम्हाला वेगवेगळ्या परमिशन मागत असतात. यात कॅमेरा, मेसेज, लोकेशन, मायक्रोफोन अशा विविध परमिशन असतात.  काही अॅप तर असे असतात की या परमिशन दिल्या नाही तर डाऊनलोडच होत नाही. तेव्हा या गोष्टी लक्षात घ्या. अनावश्य परमिशन अॅप्सना देऊ नका. सुरक्षित राहा.

मायक्रोफोन अॅक्सेस ब्लॉक करा

सर्वात आधी तुमच्या मोबाइलमधील गुगल क्रोम ओपन करा. तुम्हाला स्क्रिनच्या उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्यावर टॅप करा. यानंतर सेटिंग्सवर क्लिक करा. नंतर खाली स्क्रोल करत चला. पुढे तुम्हाला साइट सेटिंग्स असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर मायक्रोफोन अॅक्सेस दिसेल. तो तुम्ही ब्लॉक करू शकता.

follow us