लोकप्रिय मेसेजिंग ऍप टेलिग्राम आपल्या युझरसाठी काही नवीन अपडेट जारी केले आहेत. त्यात पॉवर सेव्हिंग मोड, प्लेबॅक स्पीड ऑप्शन यांसारख्या अनेक नव्या फीचर्सचा समावेश आहे. तर टेलिग्राम कडून कोणते कोणते नवे फीचर्स जोडले आहेत, ते जाणून घेऊया.
टेलीग्रामच्या नवीन अपडेटमध्ये पॉवर सेव्हिंग मोड हा नवीन पर्याय दिला आहे. ऍप अपडेट केल्यानंतर नवीन अपडेटमध्ये तुमची बॅटरी ठराविक टक्केवारीपर्यंत कमी झाली की पॉवर सेव्हिंग मोड स्वयंचलित होण्यासाठी सेट केला जाऊ शकतो.
ChatGPT : जगभरात पास, पण भारतात नापास; UPSC ची उत्तर नाही देऊ शकलं AI
टेलिग्राम युझर्स आता व्हिडिओ, पॉडकास्ट, व्हॉइस आणि व्हिडिओ मेसेजचा प्लेबॅक स्पीड बदलू शकतात. आता तुम्ही 0.2x–2.5x मधील कोणताही वेग निवडण्यासाठी 2x बटण दाबून प्लेबॅक स्पीड नियंत्रित करू शकता.
टेलीग्राम युझर्स आता त्यांना ग्रुपमध्ये कोणाला ऍड करण्याची परवानगी आहे, हे नियंत्रित करू शकणार आहेत. तुमच्यावर बंदी घातली आहे अशा एखाद्याला तुम्ही आमंत्रित करत असल्यास, तुम्ही आता त्यांना त्वरित मेसेज म्हणून इन्व्हाईट लिंक पाठवू शकता.