ChatGPT : जगभरात पास, पण भारतात नापास; UPSC ची उत्तर नाही देऊ शकलं AI

  • Written By: Published:
ChatGPT : जगभरात पास, पण भारतात नापास; UPSC ची उत्तर नाही देऊ शकलं AI

ChatGPT या तंत्रज्ञानाने  गेल्या काही महिन्यात मोठी चर्चा घडवून आणली आहे. जगभरातील लाखो लोक हे वापरत असले तरी त्याची उत्तरे देण्याची शैली पाहून लोक प्रभावित होत आहेत. पण फक्त प्रभावित होण्याचा विषय नाही कारण चॅटजीपीटीने जगभरातील अनेक मोठ्या परीक्षा पास केल्या आहेत.

ओपन एआय नावाच्या कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केले आणि तेव्हापासून याची मोठी चर्चा होते आहे.  चॅटजीपीटीने जगभरातील अनेक परीक्षा पास केल्या आहेत. चॅटजीपीटीने अमेरिकेतील मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन प्रोग्रामही क्लिअर केला आहे, सोबत अनेक विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा पास केल्या आहेत

जगभरात पास, भारतात नापास

चॅटजीपीटीने अमेरिकेतील मेडिकल परीक्षेमध्ये देखील विद्यार्थ्यांपेक्षा चांगले गुण मिळवले आहेत. यासोबतच Google Coding Interview Level 3 देखील क्लिअर केले आहे. चॅटजीपीटीची वाढती लोकप्रियता आणि विद्यार्थ्यांचा वापर पाहून जगातील अनेक शाळांमध्ये ते ब्लॉक करण्यात आले.

हेही वाचा : ईडी भाजप मंत्र्यांवर नाही तर फक्त विरोधकांवरच कारवाई करते, सिब्बलांचा केंद्रावर निशाणा

पण चॅटजीपीटीची जगभरात चर्चा होत असताना ते भारतात मात्र नापास झाले आहे. जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या UPSC च्या भारतीय नागरी सेवा परीक्षेत चॅटजीपीटी नापास झालं आहे. एनालिटिक्स इंडिया मॅगझिनने चॅटजीपीटीवरून UPSC शी संबंधित काही प्रश्न विचारले आहेत पण ज्यात चॅटजीपीटी नापास झाले आहे. मासिकाने UPSC प्रिलिम्स 2022 च्या पहिल्या पेपरमधून 100 प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

100 प्रश्नांपैकी ChatGPT फक्त 54 प्रश्नांची उत्तरे देऊ शकले आहे. 2021 मध्ये, सामान्य श्रेणीसाठी कटऑफ 87.54% होता. त्यानुसार, ChatGPT UPSC परीक्षा पास करू शकत नाही.

चॅटजीपीटीच्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार चॅटजीपीटीवर सध्या फक्त सप्टेंबर 2021 पर्यंतची माहिती आहे. त्यामुळे चालू घडामोडींना ते उत्तर देऊ शकत नाही. पण चॅटजीपीटीने भूगोल आणि अर्थशास्त्राशी संबंधित अनेक प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली आहेत. एवढेच नाही तर इतिहासातील काही प्रश्नांची उत्तरेही चुकीची आहेत. त्यामुळे जगभरात पास होणारे चॅटजीपीटी भारतात मात्र नापास झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube