ईडी भाजप मंत्र्यांवर नाही तर फक्त विरोधकांवरच कारवाई करते, सिब्बलांचा केंद्रावर निशाणा
 
          नवी दिल्ली : देशात सध्या सुरु असलेल्या ईडीच्या कारवायावरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रावर तसेच भाजपवर कडाडून टीका केली आहे. देशात सध्या केवळ विरोधकांवर ईडीच्या कारवाया सुरु आहे. मात्र भाजपच्या एकाही नेत्यावर ईडी कारवाई करताना दिसून येत नाही. विरोधकांना धमकावले जात आहे त्यांच्यावर कारवाया करत असल्याचे म्हणतच सिब्बल यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
खासदार कपिल सिब्बल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्व विरोधकांना एका मंचावर येण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी सिब्बल यांनी देशातील ईडीच्या कारवायावरून केंद्रावर निशाणा साधला आहे. सिब्बल म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवल जात आहे. जे लोक इडीच्या (ED) केसमध्ये अकडले होते, ते लोक भाजपमध्ये (BJP) गेले त्यांच्यावरील केसेस बंद करण्यात आल्या.
Irani Cup: यशस्वी जैस्वालचा डबल धमाका, आधी द्विशतक आणि नंतर शतक झळकावणारा पहिला भारतीय
आता लोकांना जागृत करण्याची वेळ आली आहे. अन्यायाच्या विरोधात आता लढण्याची गरज आहे. देशातील विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री, नेत्यांनी मला साथ द्यावी. आपण एक राष्ट्रीय मोहीम सुरू करू. भाजप विरोधात देशभरात एक आंदोलन सुरु झाले पाहिजे. त्यासाठी सर्व राज्य सरकारांनी एकत्र आले पाहिजे. असे आवाहन देखील यावेळी सिब्बल यांनी केले आहे.
Mardini Chatrapati Tararani : सोनाली साकारणार छत्रपती ताराराणींची भूमिका
येत्या 11 मार्च रोजी नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर एक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला देशातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले जाणार आहे, असेही सिब्बल यांनी सांगितले. येत्या 11 मार्च रोजी आम्ही आमचा अजेंडा लोकांसमोर मांडू. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं कौतुक केलं.


 
                            





 
		


 
                         
                        