Mardini Chatrapati Tararani : सोनाली साकारणार छत्रपती ताराराणींची भूमिका
मुंबई : मराठी अभिनेत्री (Marathi actress) सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आपल्या बहुचर्चित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात सोनाली ही छत्रपती ताराराणीची भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागून होती. आता या सिनेमाचा रोमांचकारक टिझर (Teaser) भेटीला आला आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राहुल जनार्दन जाधव हे ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या ग्रंथावर आधारित आहे. या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत.
या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली आहे. दरम्यान या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
पोस्टर वॉर! कसबा एक झाकी है, कोथरूड नागपूर बाकी है…
काय आहे सिनेमाची कथा
रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक लेक, सून, पत्नी, माता तसेच राजस्त्री या भूमिकांमध्ये देखील आदर्श प्रस्थापित केले अशा अष्टपैलू स्त्रीचे जीवनचरित्र या चित्रपटातून सर्वांसमोर येणार आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले… मी सर्वांची माफी मागतो, काय आहे प्रकरण?
सोनालीने सिनेमाचा टीझर शेअर केला
अवघ्या 25 वर्षांची मराठ्यांची राणी, जिने मुठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्य जिंकायला आलेल्या औरंगजेबाला कायमचा या मातीत गाडला. सादर करत आहोत ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ची पहिली झलक”.