पोस्टर वॉर! कसबा एक झाकी है, कोथरूड नागपूर बाकी है…

पोस्टर वॉर! कसबा एक झाकी है, कोथरूड नागपूर बाकी है…

पुणे : कसबा व चिंचवड पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये कसब्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. तर चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. दरम्यान भाजपचा बालेकिल्ला असलेला कसब्यात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांविरोधात पोस्टर बाजी करण्यात आली आहे. कसबा एक झाकी आहे, कोथरूड नागपूर बाकी आहे… अशा आशयाचे फ्लेक्स पुण्यात झळकू लागले आहे. यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा राजकीय सामना रंगणार आहे.

भाजप व महाविकास आघाडी सरकारने कसबा व चिंचवड निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. भाजपकडून या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र विरोधकांनी आपले उमेदवार या निवडणुकीत उतरवत निवडणूक लढवण्याचा निर्धारच केला. दरम्यान या दोन्ही मतदार संघाचे निकाल जाहीर झाले. यामध्ये कसब्यात भाजपच्या उमदेवाराला शह देत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. हेमंत रासने यांना पराभूत करत महविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले. आता यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे होतील दूर… जाणून घ्या उपाय

पुण्यात ठाकरे गटाकडून पोस्टर बाजी…
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा कसब्यात विजय झाला यावर ठाकरे गटाचे कसबा पेठेतील समर्थक गुरुनाथ अडीवरेकर यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचणारे बॅनर लावले आहे. शिवसेनेविरुद्धच्या कटकारस्थानांना जनतेचे कसब्यात उत्तर ! कसबा एक झाकी आहे, कोथरूड नागपूर बाकी आहे. असा मजकूर पोस्टर लिहिण्यात आला आहे.

दरम्यान यावर आता सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube