Thane Municipal Corporation Recruitment : ठाणे महापालिकेत काम करण्याची चांगली संधी चालून आली आहे. ठाणे महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात नर्सच्या (Nurse) रिक्त पदांसाठी नवीन भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत 72 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांची मुलाखत 29 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.ठाणे महानगरपालिकेच्या या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या विषयीची तपशीलवार माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.
अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागेल. मुलाखतीला हजर राहतांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, सोबत ठेवावे. या पदभरतीसाठी ठाणे महानगरपालिकेने रुग्णालयात तसेच कोव्हिड कालावधीमध्ये परिचारीका म्हणून सेवा दिलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाणार आहे.
पदाचे नाव – परिचारिका (नर्स).
एकूण रिक्त पदे – 72
शैक्षणिक पात्रता –
1. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालंत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (एचएससी)
2. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका (जीएनएम)
3. बीएससी (नर्सिंग) असल्यास प्राधान्य
4. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
5. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
‘भाजप नेत्या सना खान यांची हत्या करणाऱ्या अमित साहुला मी..,’ काँग्रेस आमदाराचा खुलासा…
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे, मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष
अर्ज फी – कोणतेही शुल्क नाही.
नोकरीचे ठिकाण – ठाणे.
मुलाखतीची तारीख – 29 ऑगस्ट 2023 सकाळी 11 वाजता.
अधिकृत वेबसाइट – https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
मुलाखतीचे ठिकाण –
कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1VMErO8gnyRDCyaC6eWauotUrNh9dBLCB/view