‘भाजप नेत्या सना खान यांची हत्या करणाऱ्या अमित साहुला मी..,’ काँग्रेस आमदाराचा खुलासा…
Bjp Leader Sana Khan Murder : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हत्या प्रकरणात मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांनी चौकशीत मोठा दावा केला आहे. संजय शर्मा यांना काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, पण काही कारणास्तव ते चौकशीसाठी उपस्थित राहु शकलेले नाही. गुरुवारी ते मानकापूर पोलिसांसमोर हजर झाले असून त्यांनी खळबळजनक दावा केला आहे.
कधी विषबाधा, कोण खिडकीतून पडले तर कोणाला गोळ्या घातल्या… गुढरित्या संपले पुतीन यांचे टीकाकार
संजय शर्मा म्हणाले, मानकापूर पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावलं पण मी हजर राहु शकलो नाही, गुरुवारी हजर झालो असून पोलिसांनी माझी चौकशी केली. सना खान हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहुला आपण ओळखत नसून सना खान हत्याकांड प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसल्याचा दावा संजय शर्मा यांनी केला आहे.
‘कामगारांच्या खिचडीचोराला बावनकुळेंचं महत्व कळणार नाहीच’; राणेंचा राऊतांवर घणाघात
माहितीनूसार, अमित साहु काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातं आहे. 1 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशात सना खान गेल्या होत्या. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी त्यांची हत्या करण्यात आली. खान यांच्या हत्येची कबुलीही अमित साहु यांनी दिली असून हत्या केल्यानंतर तो फरार होता. हत्या केल्यानंतर अमित साहु याला संजय शर्मा यांनी आश्रय दिला होता, असा संशय पोलिसांनी बळावला होता. त्यामुळे संजय शर्मा यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं.
Baplyok Release Date : नागराजच्या बापल्योकची रिलीज डेट बदलली; ‘या’ दिवशी येणार चित्रपट
सना खान गेल्या २ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. या प्रकरणी नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेहरुनिसा खान यांच्या फिर्यादीवरून आरोपी पप्पू शाहू उर्फ अमित शाहु विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अखेर याप्रकरणी नागपूर पोलिसांनी अमित शाहु याला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने सना खानची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितने पैशाच्या व्यवहारावरून पत्नी सना खानची हत्या केल्याचे समोर आले आहे. अमित शाहुने भागीदारीसाठी पत्नीकडून 50 लाख रुपये घेतले होते. सनाने पैसे परत मागितल्यावर दोघांमध्ये वाद झाला.
दरम्यान, या प्रकरणात मृत सना खान आणि आरोपी अमित शाहु सेक्सटोर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे. तो अनेक श्रीमंत लोकांना हेरून त्यांना 35 वर्षीय महिलेच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा. जाळ्यात अडकवून तो त्यांच्या अश्लील व्हिडिओ क्लीप बनवायचा. त्यानंतर ब्लॅकमेल करायचा. आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. आरोपी अमितने आतापर्यंत अनेकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.