‘कामगारांच्या खिचडीचोराला बावनकुळेंचं महत्व कळणार नाहीच’; राणेंचा राऊतांवर घणाघात
Nitesh Rane replies Sanjay Raut : ‘कोण आहेत हे बावनकुळे? म्हणणारा संजय राजाराम राऊत, त्याचं बरोबरच आहे. बावनकुळेंना हा कसा ओळखणार?, महाराष्ट्र आणि भाजपसाठी त्यांचं काय योगदान आहे?, हे संजय राऊतसारख्या खिचडीचोर, पत्राचाळच्या मराठी माणसांची घरे लुटणारा चोर, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करणारा 420, याला बावनकुळेंची ओळख असूच शकत नाही. सामान्य गरीब कामगारांच्या हक्काची खिचडी खाणारा हा खिचडीचोर त्याला बावनकुळे किंवा फडणवीस यांचं महत्व कळणारच नाही. म्हणून कोण बावनकुळे?, हा प्रश्न संजय राऊतने विचारणे योग्यच आहे, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
पवारांच्या तोंडी नेहरूंचं अभिनंदन झोंबलं; भाजप आमदार म्हणाला, गांधी घराण्याची…
आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याबाबत विचारले असता कोण बावनकुळे?, असा प्रतिप्रश्न राऊतांनी केला होता. त्यावर अत्यंत तिखट अन् खोचक शब्दांत राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले, ‘चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकी धर्म आहे. पण सामनचा कार्यकारी संपादक आणि उद्धव ठाकरेंचा कामगार संजय राऊत नेहमीच काळ्या मांजरेसारखा आड येतो.
.. तर तुमचे कपडे जागेवर राहणार नाहीत
‘हाफकिन इन्स्टिट्यूट कोविडची व्हॅक्सिन बनवणार, काय झालं त्यावेळी? व्हॅक्सिन तयार झाली का? व्हॅक्सीन तयार झाली नाही, पण आमच्याकडे अशी माहिती आहे की हाफकिनच्या इन्स्टिट्यूटच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि कामगारांना पैशासाठी ब्लॅकमेल केलं गेलं. त्यांच्यावर दबाव आणला गेला, तिथून पण काही पैसे निघतात का? यासाठी मातोश्रीशी निगडित लोक तिथे फेऱ्या मारत होते. म्हणजे नवीन काय घडवणं सोडा इन्स्टिट्यूटमध्ये जी दादागिरी आणि ब्लॅकमेल तुमच्या मालकाच्या माध्यमातून होत होते, त्याची माहिती आता महाराष्ट्रासमोर दिली, तर तुमचे कपडे जागेवर राहणार नाही हे लक्षात ठेवा’, असा इशारा राणेंनी दिला.
हे सुद्धा वाचा : Udhav Thackery यांच्या स्टेजवर 2024 पर्यंत चार-पाचच लोक दिसतील; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
चोरलेली खिचडी इंडिया आघाडीतील नेत्यांना खाऊ घाला
‘मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकांबद्दल हा खिचडीचोर मोठ्या बाता करत आहेत. पत्रकार परिषदा होणार, मोठमोठे नेते एकत्र येणार. मग त्या मुंबईतील बैठकीमध्ये जी कामगारांची खिचडी तुम्ही तुमच्या मालकाने व मालकाच्या मुलाने चोरली आहे, ती त्या नेत्यांना तरी खायला घाला. जर तुम्हाला जमत नसेल तर आमच्यातर्फे त्या विरोधकांच्या बैठकीत खिचडीचे पॅकेट पाठवू. जेणेकरून सगळे एकत्र बसा आणि खिचडी कशी चोरली यावर चर्चा करा’, असा खोचक टोला राणेंनी लगावला.