पवारांच्या तोंडी नेहरूंचं अभिनंदन झोंबलं; भाजप आमदार म्हणाला, गांधी घराण्याची…

पवारांच्या तोंडी नेहरूंचं अभिनंदन झोंबलं; भाजप आमदार म्हणाला, गांधी घराण्याची…

Sharad Pawar : भारताचे चांद्रयान (Chandrayaan 3) काल चंद्रावर यशस्वीपणे उतरले. भारताच्या या कामगिरीचे तसेच इस्त्रोतील शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक होत आहे. या शास्त्रज्ञांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याऐवजी जे देशाचे संरक्षण मंत्री राहिले त्या पवार साहेबांनी नेहरुंचं स्वागत करावं ही हास्यास्पद आणि लज्जास्पद गोष्ट आहे, असे मला वाटते. गांधी घराण्याची जर लाचारी करायचीच होती तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाचारी करण्याची गरज नव्हती आणि पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडून तर त्याची अपेक्षाच नव्हती, अशा शब्दांत भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली.

Sanjay Raut : पराभवाच्या भीतीने विरोधकांवर खटले, कोणीही ‘इंडिया’तून बाहेर पडणार नाही; राऊतांचा भाजपवर निशाणा

भारताचे चांद्रयान काल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. इस्त्रोच्या या कामगिरीचे कौतुक देशातील राजकारणी मंडळींनीही केले. केंद्रातील भाजप सरकारचे कट्टर विरोधक शरद पवार यांनी मात्र या कामगिरीचे कौतुक करताना पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेतले. त्यांचे दूरदृष्टीचे स्वागत केले. त्यांचे हेच कौतुकाचे बोल भाजप नेत्यांना झोंबले आहेत. आमदार लाड यांनी पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

लाड पुढे म्हणाले, कदाचित मला वाटतं की साहेबांना स्मृतीभ्रंश झाला असेल त्यामुळ त्यांनी मोदींजींचे नाव घेण्यापेक्षा पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेतले. कदाचित यामध्ये ते सुधारणा करतील आणि देशातील जनता, इस्त्रोचे शास्त्रज्ञ आणि देशातील सरकारचे ते स्वागत करतील अशी माझी अपेक्षा आहे.

‘ग्राहकांचेच हित जपायचे असेल तर कांद्याला अनुदान द्या’; कांदाप्रश्नी थोरातांचा मोदी सरकारवर संताप

काय म्हणाले होते शरद पवार?

आज ऐतिहासिक दिवस आहे. हे तंत्रज्ञान यशस्वी करुन भारत विश्वातला एक नंबरचा देश बनला. कधी यश येतं कधी अपयश येतं. यश मिळालं म्हणून कधी जमिनीवरचे पाय या देशातल्या वैज्ञानिकांनी कधी हलवले नाहीत. आज चांद्रयान 3 च यशस्वी लँडिंग करुन जगाला दाखवलं की, आमचे वैज्ञानिक हे जागाला प्रोत्साहित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जवाहरलाल नेहरू यांनी या देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केलं वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलं त्या प्रयत्नांचं आज चीज झालं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube