Download App

ठाणे महानगरपालिकेत 70 जागांसाठी भरती, थेट मुलाखत; 1 लाख 85 हजार रुपये महिन्याला पगार

  • Written By: Last Updated:

 

Thane Municipal Corporation Recruitment : ठाणे महापालिकेत (Thane Municipal Corporation Recruitment) लकरच काही जागांसाठी भरती होतेय. यासाठीची अधिसुचना प्रसिध्द झाली आहे. एकूण 70 विविध पदांसाठी ही भरती होत आहे. ही भरती प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि व्याख्याता या पदांसाठी एकत्रित वेतनावर 179 दिवसांच्या कालावधीसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 4 जुलै आणि 5 जुलै रोजी थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. (Thane Municipal Corporation Recruitment for 70 posts of Professor Associate Professor selection through interview)

https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M

एकूण जागा – 70 जागा

रिक्त जागांचा तपशील
प्राध्यापक – 7 पदे

सहयोगी प्राध्यापक – 8 पदे

व्याख्याता – 55 पदे

वेतन –
प्राध्यापक – रु. 1,85,000/- प्रति महिना

सहयोगी प्राध्यापक – रु. 1,70,000/- प्रति महिना

व्याख्याता – रु. 1,00,000/- प्रति महिना

गुंडांकडून जमिनींवर जबरदस्तीने ताबा; शिवसेनेसह राष्ट्रवादी आक्रमक 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS, M.D., M.S., D.N.B. पर्यंतचे शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे., तसेच किमान तीन वर्षांचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

तर सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) पदासाठी अर्ज करण्यासाठी, पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS, M.D., M.S., D.N.B. पर्यंतचे शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. शिवाय, किमान चार वर्षांचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

अधिव्याख्याता पदासाठी अर्ज करण्यासाठी, पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस, M.D., M.S., D.N.B. पर्यंतच्या शिक्षण घेतलेले असावे. सोबतच किमान चार वर्षांचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे-

बायोडेटा,

10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र,

शाळा सोडल्याचा दाखला,

जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना)

पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारिख –
4 जुलै आणि 5 जुलै (सकाळी 11 वाजता मुखालतीस सुरूवात होणार आहे)

 

मुलाखतीचे ठिकाण
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह,
स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत,
सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी,
ठाणे.

अधिक माहितीसाठी खालाील संकेतस्थळाला भेट द्या : https://thanecity.gov.in/

Tags

follow us