गुंडांकडून जमिनींवर जबरदस्तीने ताबा; शिवसेनेसह राष्ट्रवादी आक्रमक

गुंडांकडून जमिनींवर जबरदस्तीने ताबा; शिवसेनेसह राष्ट्रवादी आक्रमक

अहमदनगर : अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये काही गुंडांच्या टोळ्या या मोक्याच्या जागांवर जबरदस्तीने ताबा घेत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच जागामालकांकडून जबरदस्तीने खंडणी वसूल केले जात असल्याचे प्रकार घडत आहे. या घटनांच्या विरोधात अनेक तक्रारी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आल्या होत्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्येही असे प्रकार घडत आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी केले. (In Ahmednagar hooligan gangs were forcibly enslaved land, )

https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M

दरम्यान, या गावगुंडांच्या टोळ्यांच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांसह पीडित तक्रारदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या गुंडांच्या टोळ्यांची दहशत रोखून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्च्यामध्ये ठाकरे गटाचे विक्रम राठोड आणि राष्ट्रवादीचे पारनेरचे आ. निलेश लंके, राहुरीचे आ.प्राजक्त तनपुरे हे उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने पीडित तक्रारदार तसेच नागरिक व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राठोड यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे तक्रारदारांच्या तक्रारी मांडल्या. नगर शहर, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असे फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. याबाबत तक्रारदार आपल्या भेटी घेत असून आपल्या व्यथा मांडत आहे. या घटनांमध्ये वयोवृद्ध, असाहाय्य, निराधार, विदेशात असलेले, महानगरपालिकेचे थकबाकीदार अशा लोकांना, गावगुंड टोळ्यांकडून जबरदस्तीने त्यांच्या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रकार सुरु आहे.

केंद्रीय पथकाने उघड केला तांदळाचा काळाबाजार, सात राईस मिलर्सवर तीन वर्षाची बंदी 

यासर्व प्रकारामध्ये प्रशासन देखील गुंडाना मदत करत असल्याचा दावा राठोड यांनी केला. हे गाव गुंड प्रशासनाच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून या लोकांच्या जागेवर ताबा मिळवत आहे. या तक्रारी महसूल प्रशासन, पोलीस ठाण्यातील प्रशासन यांच्याकडेही गेल्या आहेत. मात्र त्यात न्याय न मिळाल्याने आता या तक्रारी राजकीय पक्षांकडे येत आहेत. या समस्यांमधून नागरिकांची सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी आमदार निलेश लंके यांच्यासह आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी अनेक पीडित कुटुंबीयांनी आपले गाऱ्हाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले.

आमदार लंके म्हणाले, ताबा मिळवण्याचे प्रकार हे केवळ नगर शहरामध्येच नाही तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत. प्राईम लोकेशन ठिकाण असलेल्या जागा या करोडोच्या किमतीने विकल्या जात असल्या तरी मूळ मालकांना यामध्ये दहशतीखाली दमदाटी करत गप्प केले जात आहे. यामुळे अशांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सर्व ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी या अशा तक्रारी आपल्याकडे सादर करण्यात याव्या. या प्रकरणांची सविस्तर माहिती घेतली जाईल, असे म्हणाले

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube