Apple Store Rent: भारतात पहिले अधिकृत Apple Store उघडले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ते सुरू करण्यात आले आहे. अॅपलचे सीईओ टीम कूक स्वत: त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतात पोहोचले असून त्यांनी स्वत:च्या हाताने या स्टोअरचे गेट उघडले. मायानगरीमध्ये उघडलेले हे Apple BKC स्टोअर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये उघडण्यात आले आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की या जागेसाठी टीम कुक दर महिन्याला लाखो रुपये अंबानींना भाडे देणार आहे.
दुकानाचे भाडे महिन्याला 42 लाख आहे.
रिपोर्टनुसार, अॅपलने रिलायन्स मॉलमध्ये भारतातील पहिले स्टोअर उघडण्यासाठी दीर्घ करार केला आहे. Apple Store साठी सुमारे 20,800 चौरस फूट जागा भाड्याने देण्यात आली आहे, ज्यावर हे Apple BKS उघडण्यात आले आहे. ही जागा भाड्याने घेण्यासाठी Apple कंपनीने 133 महिन्यांचा म्हणजे 11 वर्षांचा करार केला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, या जागेसाठी अॅपलच्या वतीने मुकेश अंबानींना दर महिन्याला सुमारे 42 लाख रुपये भाडे दिले जाणार आहेत.
शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, ‘तुम्ही प्रवक्ते नेमकं कुणाचे’
दर तीन वर्षांनी भाडे वाढेल
Apple BKC स्टोअरचे भाडे दर तीन वर्षांनी सुधारित केले जाईल. करारानुसार, भाड्याच्या निश्चित रकमेत 3 वर्षांच्या अंतराने 15 टक्के वाढ केली जाईल. अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उघडलेल्या या स्टोअरसाठी, कंपनीला दर महिन्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात भाडे तर भरावे लागणार आहेच, शिवाय पहिल्या तीन वर्षांच्या महसुलातील 2 टक्के आणि नंतर 2.5 टक्के वाटाही द्यावा लागेल.
बहुचर्चित ‘पुढारी वडा’च्या खोडाला पालवी फुटली, आमदार रोहित पवारांकडून फोटो शेअर
या स्टोअरमध्ये 100 कर्मचारी काम करतील
मुंबईत उघडलेल्या या अॅपल स्टोरमध्ये सध्या 100 कर्मचारी काम करतील, जे लोकांशी 20 भाषांमध्ये संवाद साधू शकतील. ऍपलच्या वेबसाइटप्रमाणे, येथे देखील वापरकर्त्यांना ट्रेड इन प्रोग्रामचा पर्याय मिळेल, ज्या अंतर्गत जुन्या उपकरणांची देवाणघेवाण केली जाऊ शकते आणि नवीन उपकरणे खरेदी केली जाऊ शकतात. याशिवाय या अॅपल स्टोअरमध्ये 4.50 लाख लाकूड घटकांचा वापर करण्यात आला आहे. या अॅपल स्टोअरमध्ये अॅपल पिकअप सेवा देखील दिली जाणार आहे म्हणजेच ग्राहक घरबसल्या उत्पादनाची निवड करून ऑर्डर करू शकतात आणि स्टोअरमध्ये जाऊन पिकअप करू शकतात.
विधीमंडळाचे अधिवेशन बोलवा, नानांचं राज्यपालांना पत्र
स्टोअर उघडण्यासाठी 25 वर्षे प्रतीक्षा
कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतातील हे पहिले अॅपल स्टोअर 100% अक्षय ऊर्जेसह कार्यरत असेल. आम्ही तुम्हाला सांगूया की Apple ने भारतात पहिल्यांदा Macintosh 1984 मध्ये आणले होते आणि आता 25 वर्षांनंतर Apple BKC, मुंबई मध्ये पहिले Apple Store उघडले आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले, ‘एक लांबचा प्रवास झाला आहे, अॅपल भारतात आपले स्टोअर उघडत आहे याचा मला आनंद आहे.’