शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, ‘तुम्ही प्रवक्ते नेमकं कुणाचे’

शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, ‘तुम्ही प्रवक्ते नेमकं कुणाचे’

Shambhuraj Desai on Sanjay Raut : मी सत्य बोलतच राहणार, मी कोणाच्या बापाला घाबरत नसल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी केलं होते. यावरुन उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चार वेळा खासदार आहेत तर थोडं सभ्यपणे बोला. ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत पण राष्ट्रवादीची (NCP) वकिली करता तर त्यांचे प्रवक्ते व्हा, असा सल्ला दिला आहे.

शंभुराज देसाई म्हणाले की, संजय राऊत हे ठाकरे गटाचे आहेत आणि ते राष्ट्रवादी आणि भाजपवर बोलतात. मला वाटतं की खासदार संजय राऊत यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते केले पाहिजे. अजितदादांनी सनसनीत टोला लावून देखील पुन्हा वर तोंड करुन म्हणतात की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. संजय राऊत तुम्ही खासदार आहात, एकाचे गटाचे प्रवक्ते आहात अशी भाषा शोभत नाही. चार वेळा खासदार आहे म्हणून सांगता मग संसदीय भाषा वापरली पाहिजे. लोकप्रतिनिधी बोलतात तसे सभ्यपणे बोलले पाहिजे, अशी टीका शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

संजय राठोडही भिडले ! म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन; भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांना पाठिशी घालू नका

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार वेगाने काम करत आहे. मागच्या सरकारच्या काळात जे निर्णय झाले नाहीत ते निर्णय घेऊन अंमलबाजावणी करत आहेत. हे संजय राऊतांना बघवत नाही. राज्यात अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, शेतकऱ्यांचे नुकसान झाले एकातरी शेतकऱ्यांच्या बांधावर संजय राऊत गेले का? असा सवाल शंभुराज देसाई यांनी केला आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने दिला. अतिशय चांगलं नियोजन आम्ही केलं होतं. यासाठी 32 कमिट्या अधिकारी आणि श्री सेवकांच्या तयार केल्या होत्या. मात्र कार्यक्रमाच्या अगोदर उष्णता वाढली, वातावरणात बदल झाल्याने दुर्दैवाने 12 ते 13 लोकांचा मृत्यू झाला. पण नाना पटोलेंनी याचे राजकीय भांडवल करु नये. स्व:ता आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी देखील सांगितले की हा निसर्गाचा हल्ला होता. कोणीही राजकारण करु नका, असे सांगितले होते. आम्ही काय नियोजन केले होते याची माहिती नाना पटोलेंना पाहिजे असे तर मी देईल, असे शंभुराज देसाई यांनी नाना पटोले यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube