Summertime : उन्हाळ्यात फिरायला जाताय तर ‘या’ ठिकाणील हॉटेलला भेट द्या

Summertime : मुंबईतील ताज हॉटेल (Taj Hotel in Mumbai) हे जगातील नामांकित कंपन्यांपैकी एक मानले जाते. या हॉटेलची इमारत ही एक ट्रेडमार्क बिल्डिंग आहे. जेआरडी टाटा यांनी हे हॉटेल बांधले आहे. 16 डिसेंबर 1903 रोजी या हॉटेलचा शुभारंभ झाला होता. हे हॉटेल बांधण्यामागे एक रोचक कथा सांगण्यात येते. जेआरडी टाटा एकदा ब्रिटेनला फिरण्यासाठी गेले होते. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (22)

Summertime

Summertime : मुंबईतील ताज हॉटेल (Taj Hotel in Mumbai) हे जगातील नामांकित कंपन्यांपैकी एक मानले जाते. या हॉटेलची इमारत ही एक ट्रेडमार्क बिल्डिंग आहे. जेआरडी टाटा यांनी हे हॉटेल बांधले आहे. 16 डिसेंबर 1903 रोजी या हॉटेलचा शुभारंभ झाला होता. हे हॉटेल बांधण्यामागे एक रोचक कथा सांगण्यात येते. जेआरडी टाटा एकदा ब्रिटेनला फिरण्यासाठी गेले होते. तेथील वॉटसन येथे भारतीय असण्याच्या कारणावरुन त्यांना हॉटेलमध्ये थांबण्यास मनाई करण्यात आली. या हॉटेलमध्ये केवळ गोऱ्या लोकांना प्रवेश होता. यानंतर जेआरडी टाटांनी स्वत जगाला हेवा वाटेल असे हॉटेल असे बांधायचे ठरवले व ताज हॉटेल बांधले.

https://www.youtube.com/watch?v=vev7UU9ANZA

सुजान शेरबाग (Sujan Sherbagh) हे एक अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. याठिकाणचे रणथंभोर हे जंगल, वन्यप्राण्यांनी भरलेले आणि आरामशीर वाघांचे दर्शन घडवणारे ठिकाण आहे. याठिकाणी राहण्यासाठी अतिउत्कृष्ट शिबिरे आहेत. इथे नुकतेच नूतनीकरणाने प्रगती देखील केली आहे. ज्यामुळे गवताळ प्रदेश आणि त्यापलीकडे असलेल्या टेकडीच्या विस्तीर्ण दृश्य पहायला मिळते. याठिकाणी बार, डायनिंग एरिया, लायब्ररी, ओपन-एअर डेक आणि मोठ्या मैदानी पूलमध्ये विणलेल्या मोकळ्या आणि स्टायलिश मोकळ्या जागेतून व्हिस्टाचा आनंद लुटता येतो. याठिकाणी बारा लक्स तापमान-नियंत्रित तंबू आहेत. ज्यात एक रॉयल सूट आणि खाजगी कंपाऊंडमध्ये स्वतःचे पूल असलेले दोन शाही सूट आहेत

रवा वडा रेसिपी

 

ITC Grand Chola Hotel चेन्नई मधील 5 तारांकित हॉटेल आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हे चेन्नईतील सर्वात मोठे हॉटेल आहे. संपूर्ण भारतातील हे तिसरे सर्वात मोठे हॉटेल आहे. मुंबईचे कन्व्हेन्शन सेंटर हॉटेल आणि ग्रँड हयात हॉटेल प्रथम आणि द्वितीय आहेत. चेन्नईतील हे विशाल हॉटेल 16 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. ते तयार करण्यासाठी सुमारे 12 हजार दशलक्ष म्हणजेच सुमारे 1200 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या हॉटेलमध्ये देशातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर आहे, जे एक लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधले गेले आहे. ३० हजार स्क्वेअर फूटमध्ये बॉल रूम बांधण्यात आली असून, त्यात एकही खांब नाही आहे. स्टारवुड हॉटेल ग्रुपच्या लक्झरी कलेक्शनमध्ये ते नवव्या क्रमांकावर आहे.

Exit mobile version