रवा वडा रेसिपी

साहित्य
- दीड कप बारीक रवा
- अर्धा कप दही
- अर्धा कप पाणी
- चवीनुसार मीठ
- बारीक चिरलेली मिरची
- चिरलेले आलं
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- अर्धा चमचा जिरं
- तळण्यासाठी तेल
कृती
सर्वप्रथम बारीक रवा घेऊन त्यात अर्धा कप दही, पाणी, मीठ, बारीक चिरलेली मिरची,चिरलेले आलं, कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं हे सर्व सारण एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर सर्व सारण एकत्र करावे आणि चांगले मिक्स करुन घ्यावे. चांगले फेटल्यानंतर १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर वडे करण्यास सुरुवात करावी. अशाप्रकारे झटपट मेदूवडे तयार.