देशातील सोन्याचे दर पुन्हा कमी झाले आहेत. (Gold) आज सोमवार, 15 जूनला बहुतांश शहरांमध्ये सोन्याचे भाव कमी झाले. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,220 रुपयांपर्यंत खाली आला. गेल्या आठवड्यात 24-कॅरेट सोन्याच्या भावात 6680 रुपयांची घट झाली, तर 22-कॅरेट सोने 3400 ० रुपयांनी स्वस्त झाले. मात्र, भारताबाहेर सोन्याचे भाव वाढले आहेत. रॉयटर्सच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चे (तात्काळ खरेदी-विक्रीसाठीचे सोने) भाव 2 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 4204.11 डॉलर्सवर पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराणच्या मोठ्या संघर्षानंतर आता अधिकाऱ्यांमध्ये सर्वसमावेशक शांतता कराराबाबत सहमती झाली आहे, यामुळे तेलाच्या किमतीत घट झाली असून महागाई आणि उच्च व्याजदरांबाबतची चिंता काहीशी कमी झाली आहे. ‘ब्रेंट क्रूड ऑईल’चा भाव 3.6 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 83.68 डॉलर्सवर आला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील या करारावर शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये अधिकृतपणे स्वाक्षरी केली जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘ट्रुथ सोशल’वर या कराराची घोषणा केली.
सरकारी कर्मचाऱ्याशी लग्न करून सोन अन् रोख रक्कम पळवली; धाराशिवमधील धक्कादायक षडयंत्र आलं समोर
दिल्लीतील सोन्याचे भाव : राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,49, 220 रुपये आहे. 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,36,790 रुपये आहे.
मुंबई आणि कोलकाता: मुंबई आणि कोलकातामध्ये 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,36, 640, तर 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,49,070 रुपये आहे.
तर चेन्नईमध्ये 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,51,190 रुपये आहे. 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,38,590 रुपये आहे.
पुणे आणि बेंगळुरू या दोन्ही शहरांमध्ये 24 -कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,49,070 रुपये आहे आणि 22 -कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,36,640 रुपये आहे.
| शहर | 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) | 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) |
| दिल्ली | 136790 | 149220 |
| मुंबई | 136640 | 149070 |
| अहमदाबाद | 136690 | 149120 |
| चेन्नई | 138590 | 151190 |
| कोलकाता | 136640 | 149070 |
| हैदराबाद | 136640 | 149070 |
| जयपुर | 136790 | 149220 |
| भोपाळ | 136690 | 149120 |
| लखनऊ | 136790 | 149220 |
| चंदीगड | 136790 | 149220 |
