Download App

साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी अर्थसहाय्य देणे

LetsUpp | Govt.Schemes

साध्या यंत्रमागांना अतिरिक्त तंत्राची जोड (Addition of technique)देऊन यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

योजनेच्या प्रमुख अटी :
▪ केंद्र शासनाने यंत्रमागधारकाला अनुदान मंजूर केलेले असावे.
▪ वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यास तपासणीकरिता यंत्रमाग उपलब्ध करून द्यावे लागेल.
▪ यंत्रमागधारकांनी अनुदान मागणी प्रस्तावासोबत ओळखपत्र द्यावे लागेल.
▪ यंत्रमाग विद्युत पुरवठाबाबत वीज बिल प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक राहील.

गुजरात पॅटर्नचा भाजपला धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याने दिला राजीनामा

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
✔ केंद्र शासनाने अनुदानाची रक्कम मंजूर केलेल्या आदेशाच्या प्रतीसह अनुदान मागणीचा प्रस्ताव.
✔ ओळखपत्र (निवडणूक पत्र, आधार कार्ड, विद्युत बिल .)

लाभाचे स्वरूप असे :
▪ प्रति यंत्रमाग एकूण खर्चाच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत जी कमी असेल, त्याप्रमाणे 8 यंत्रमागास 80,000 रुपये प्रति यंत्रमागधारक इतके अर्थसहाय्य दिले जाते.

या ठिकाणी संपर्क साधावा : संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय , नागपूर.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us