गुजरात पॅटर्नचा भाजपला धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याने दिला राजीनामा

गुजरात पॅटर्नचा भाजपला धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याने दिला राजीनामा

Karnatak BJP : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यावेळी कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होणार असे अंदाज वर्तवले जात आहेत. सध्या कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असून त्यांच्यासमोर सत्ता राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर काही सर्व्हेनुसार यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असे बोलले जात आहे.

यावेळी कर्नाटकमध्ये भाजप आपला गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांचे तिकीट कापायला सुरुवात झाली आहे. काल मंगळवारी रात्री भाजपची पहिली निवडणुक यादी जाहीर झाली आहे. यामध्ये भाजपचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे ते नाराज झाले असून त्यांनी आपला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अजित पवारांनी आमचे 40 आमदार पाडण्याची तयारी केली होती; शहाजी बापूंचा दावा

मी भीकेचा कटोरा घेऊन फिरणारा नेता नाही, मी एक स्वाभीमानी नेता आहे. कुणाच्याही दडपणाखाली काम करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपला निवडणुकीआधीच मोठा धक्का बसला आहे. भाजपने आपल्या पहिल्या यादीत 189 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचे तिकीट देखील कापण्यात आले आहे.

त्यामुळे आता कर्नाटकमध्ये देखील भाजप आपला गुजरात पॅटर्न राबवताना दिसते आहे. याआधी भाजपने गुजरातच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची तिकीटं कापली होती. त्यामध्ये काही विद्यमान आमदार व विद्यमान मंत्री देखील होते. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपने 150 जागांचा आकडा ओलांडला होता.

शाब्दिक चकमकीनंतर आमदार वैभव नाईकांच्या अंगावर राणे समर्थक धावले…

पण भाजपचा हाच फॉर्म्युला इथे लागू होईल का याबाबत अनेक साशंकता व्यक्त केल्या जात आहेत. कर्नाटक हे एकमेव दक्षिणेतील राज्य भाजपकडे आहे. अशाप्रकारे दिग्गज नेत्यांची तिकीट कापल्याने भाजपला फायदा होईल की भाजपला याचा धक्का बसेल हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube