UPI ID Rules : गेल्या काही वर्षांपासून देशात ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहाराचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आज अनेकजण घरी बसून दररोज हजारो रुपयांची देवाणघेवाण यूपीआयच्या (UPI) मदतीने करत आहे. तर आता उद्यापासून म्हणेजच 1 फेब्रुवारीपासून यूपीआयच्या नियमांमध्ये बदल होणार आहे.
माहितीनुसार, 1 फेब्रुवारीपासून यूपीआय आयडी तयार करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे आता अनेकांचे यूपीआय आयडी रद्द होण्याची शक्यता आहे.
एनपीसीआय सूचना नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने याबाबात माहिती देत अधिसूचना जारी केली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार नवीन आयडीमध्ये फक्त अक्षरे आणि अंक वापरले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता नवीन आयडी तयार करण्यासाठी अक्षरे आणि अंक व्यतिरिक्त इतर काहीच वापर करता येणार नाही. जर तुम्ही असं केलं तर तुमचा आयडी रद्द करण्यात येणार आहे. नवीन नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याची माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिली आहे.
कोणत्या प्रकारचा UPI आयडी तयार करता येतो?
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीपासून अक्षरे आणि अंक व्यतिरिक्त यूपीआय आयडीमध्ये कोणतेही विशेष वर्ण वापरले गेले तर ते त्वरित रद्द करण्यात येणार आहे. नवीन UPI आयडीचे उदाहरण : aber1289sk.
चूक नसतानाही राजीनामा दिला, तेलगी घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा
तर दुसरीकडे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही. सर्व नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत. देयकांबाबत कोणतेही नवीन नियम लागू केलेले नाहीत. यूपीआय आयडी तयार करण्यासाठी तुम्ही पेटीएम, फोन पे, गुगल पे सारख्या अॅप्सचा देखील वापर करू शकता.