चूक नसतानाही राजीनामा दिला, तेलगी घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा

  • Written By: Published:
चूक नसतानाही राजीनामा दिला, तेलगी घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा

Chhagan Bhujbal On Sharad Pawar : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (Jadhav Group of Institutes) , पुणे कडून आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा (Telgi Fake Stamp Scam) प्रकरणात मोठा खुलासा करत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरणात माझी काहीच चूक नसताना देखील माझा राजीनामा घेण्यात आला होता. तेलगी प्रकरण दोन- तीन राज्यात होतं, त्यामुळे मी सुप्रीम कोर्टात गेलो. हे प्रकरण सीबीआयकडे द्या अशी मागणी मी त्यावेळी न्यायालयात केली आणि त्यानंतर या प्रकरणात ट्रकभर कागद आणले. त्यात छगन भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं. असं देखील छगन भुजबळ म्हणाले.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री म्हणून तसेच गृहमंत्रिपदाचा मला राजीनामा द्यावा लागला आणि त्यावेळी माथ्यावर हा तेलगी प्रकरणाचा शिक्का बसला होता. मला शरद पवारांना सांगायचं आहे की, साहेब राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केली. तुम्ही आता जे सांगता की पुढे काय होणार ते राजकारण होतं. त्यावेळी तर तसं काही नव्हतं ना. असं देखील ते म्हणाले.

तसेच त्यांनी या मुलाखतीमध्ये विधानसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न आला त्यामुळे माझा लीड कमी झालं अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. तसेच मला वाटल माझं नाव मंत्रिपदासाठी येईल. कारण, पक्ष स्थापनेपासून मी पक्षासोबत आहे. अजित पवारांना पहिला पाठिंबा देणार मीच होतो. त्यामुळे, मानसन्मानला धक्का लागला तर ते योग्य नाही. असेही या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ म्हणाले.

तर मी मुख्यमंत्री झालो असतो

जर मी काँग्रेस सोडली नसती तर मुख्यमंत्री झालो असतो. दिल्लीत माझ्या नावावर एकमत झाले होते पण मी शरद पवार साहेबांसोबत असल्याने मुख्यमंत्री झालो नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

Chhagan Bhujbal : … तर मी मुख्यमंत्री झालो असतो; छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी काँग्रेसमधून शरद पवार बाहेर आले आणि मी सांगितलं की मी पवार साहेबांसोबत राहील त्यावेळेला काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या कार्यलयातून मुकुल वासनी, शीला दीक्षित, कळमळी साहेब, राजेश पायलट आणि अहमद पटेल म्हणत होते की, तुम्ही दिल्लीला या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री घोषित करतो. मात्र मी म्हटलो की, मी पवार साहेबांसोबत आलेलो आहे शिवसेना सोडून त्यांनी मंडळाची अंमलबजावणी केली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण दिले आहे. मी त्यांना सोडून येणार नाही. नाहीतर त्याच वेळी मी मुख्यमंत्री झालो असतो असं छगन भुजबळ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube