Download App

तारबंदी योजना नेमकी काय आहे? वाचा!

LetsUpp | Govt.Schemes
शेतात पिकांची पेरणी (Planting of crops)केल्यानंतर हवामानामुळे (weather) पिकाची नासाडी तर होणार नाही ना, की कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव (Outbreak of diseases)तर नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना (Farmers)सतावत असते. पण बहुतांश शेतकऱ्यांची दुसरी मोठी समस्या आहे. ते म्हणजे शेतातील उभ्या पिकांवर भटक्या जनावरांचा हल्ला. अनेक ठिकाणी भटकी जनावरे हे शेतमालाचे नुकसान करतात. सध्याच्या काळात शेतीमध्ये यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतीसाठी जनावरांची भूमिका जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता गाई, बैल, रानडुक्कर(wild boar), आदी शेतात किंवा रस्त्यावर उघड्यावर फिरताना दिसतात.

Anupam Kher : शूटिंगदरम्यान अनुपम खेर गंभीर जखमी; फ्रॅक्चर झालेला फोटो शेअर करुन दिली माहिती

त्यामुळे ही जनावरे शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या बनत आहेत. त्यामुळे ते टाळण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेताला तारेचे कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे. पण तरीही असे अनेक शेतकरी आहेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसून शेताला तार बंदी करून घेऊ शकत नाहीत. अशा स्थितीत दुर्बल घटकातील शेतकऱ्यांसाठी देशातील काही राज्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे.

देशातील हरियाणा, राज्यस्थानसह अजून काही राज्यामध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप ही योजना सुरु करण्यात आलेली नाही. पण ही योजना महाराष्ट्रात सुरु झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल हे नक्की.

या पार्श्वभूमीवरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकं काय पात्रता असावी? आणि या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल, याबाबतची थोडक्यात माहिती आपण पाहूयात…

तारबंदी योजनेचा काय फायदा होणार? :
● शेतकरी त्यांच्या शेताला कुंपण घालून जनावरांपासून त्यांचे संरक्षण करू शकतात.
● या योजनेंतर्गत वायरिंगच्या खर्चाच्या 50 टक्के रक्कम सरकार उचलणार आहे. तर उर्वरित 50 टक्के वाटा शेतकऱ्यांचा असेल.
● यामध्ये सर्वाधिक 40 हजार रुपयांपर्यंतचा खर्च सरकार करणार आहे.
● या योजनेचा लाभ राज्यातील अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
● जास्तीत जास्त 400 मीटरपर्यंत कुंपण घालण्यासाठीच अनुदान दिले जाईल.
● हे लावल्यानंतर भटके प्राणी पिकांचा नाश करू शकणार नाहीत.

तारबंदी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो :
● या योजनेंतर्गत ज्या राज्यांचा समावेश आहे, त्या राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे.
● शेतकऱ्याकडे 0.5 हेक्टर लागवडी योग्य जमीन असावी.
● अर्जदाराचे बँक खाते असावे.
● तुम्ही आधीच इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाही.

तारबंदी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार :
● आधार कार्ड
● ओळखपत्र
● पत्त्याचा पुरावा
● मोबाईल नंबर
● पासपोर्ट आकाराचा फोटो
● शिधापत्रिका

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us