फक्त ॲप डिलीट करून उपयोग नाही! ट्रू कॉलरवरून नंबर हटवण्यासाठी काय कराल?

केवळ ट्रू कॉलर ॲप मोबाईलमधून अनइन्स्टॉल केल्याने किंवा अकाउंट बंद केल्याने तुमचा नंबर कंपनीच्या डेटाबेसमधून आपोआप हटत नाही.

Untitled Design   2026 10 15T141733.784

Untitled Design 2026 10 15T141733.784

What should you do to remove a number from Truecaller? : आजकाल अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलची ओळख पटवण्यासाठी आणि स्पॅम कॉलपासून बचाव करण्यासाठी ट्रू कॉलरच्या अँपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, अनेकांना आपला मोबाईल नंबर आणि त्याच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती इतरांना ट्रू कॉलरवर सर्च करून पाहावी, असे वाटत नाही. तुम्हाला देखील तुमच्या गोपनीयतेची काळजी नसेल आणि ट्रू कॉलरच्या डायरेक्टरीमधून स्वतःचा मोबाईल नंबर हटवायचा असेल, ते त्यासाठी काही महत्वाच्या स्टेप्स पूर्ण कराव्या लागतील.

विशेष म्हणजे, केवळ ट्रू कॉलर ॲप मोबाईलमधून अनइन्स्टॉल केल्याने किंवा अकाउंट बंद केल्याने तुमचा नंबर कंपनीच्या डेटाबेसमधून आपोआप हटत नाही. यासाठी सर्वप्रथम ट्रू कॉलर अकाउंट डीॲक्टिव्हेट करावे लागते आणि त्यानंतर नंबर अनलिस्ट करण्यासाठी स्वतंत्र विनंती पाठवावी लागते. ट्रू कॉलर अकाउंट डीॲक्टिव्हेट करण्यासाठी अँड्रॉइड वापरकर्त्यांनी सर्वप्रथम मोबाईलमध्ये ॲप उघडावे. त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सच्या मेन्यूवर टॅप करून सेटिंग्समध्ये जावे. येथे प्रायव्हसी सेंटरचा पर्याय निवडावा.

ब्रेकिंग : ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस; राहुल गांधींनाही फटकारलं

दुसरीकडे, आयफोन वापरकर्त्यांनी ॲप उघडल्यानंतर स्वतःच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करून सेटिंग्स मध्ये जावे आणि त्यानंतर प्रायव्हसी सेंटर हा पर्याय निवडावा. या विभागात डिऍक्टिव्हेट माय अकाउंट हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप केल्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार अकाउंट बंद करण्याची पुष्टी करावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे ट्रू कॉलर अकाउंट डीॲक्टिव्हेट होईल. मात्र, त्यानंतर कॉलर आयडेंटिफिकेशन, स्पॅम प्रोटेक्शन आणि अकाउंटशी संबंधित इतर सुविधांचा वापर करता येणार नाही.

अकाउंट डीॲक्टिव्हेट केल्यानंतरही तुमचा मोबाईल नंबर ट्रू कॉलरच्या डायरेक्टरीमधून हटवण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी ट्रू कॉलरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अनलिस्टिंग या विभागात प्रवेश करावा. त्यानंतर अनलिस्ट युवर नंबर हा पर्याय निवडून दिलेल्या जागेत आपला मोबाईल नंबर टाकावा. नंबर योग्य असल्याची खात्री केल्यानंतर अनलिस्ट करण्याची विनंती सबमिट करावी. यानंतर तुमची विनंती कंपनीकडे पाठवली जाईल. ट्रू कॉलरच्या माहितीनुसार, नंबर हटवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 24 तासांपर्यंत वेळ लागू शकतो. त्यामुळे विनंती पाठवल्यानंतर नंबर लगेच दिसेनासा झाला नाही, तर काही काळ प्रतीक्षा करावी.

Imran Khan Notice : इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस, OCI कार्डधारकाला भारतात आंदोलन करता येतं का?

तुम्हाला ट्रू कॉलर वरून नंबर हटवायचा नसून केवळ नाव बदलायचे असेल, तर त्यासाठी उपलब्ध असलेला नाव बदलण्याचा पर्याय वापरता येऊ शकतो. मात्र, नाव बदलणे आणि नंबर अनलिस्ट करणे या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे ट्रू कॉलरच्या डायरेक्टरीमधून तुमचा नंबर हटवायचा असेल, तर आधी अकाउंट डीॲक्टिव्हेट करणे आणि त्यानंतर अनलिस्टिंगची विनंती सबमिट करणे महत्त्वाचे आहे. केवळ ॲप अनइन्स्टॉल केल्याने तुमचा नंबर कंपनीच्या डायरेक्टरीमधून हटत नाही. तसेच, नंबर अनलिस्ट केल्यानंतरही इतर स्रोतांमधून उपलब्ध असलेली माहिती किंवा इतरांच्या फोनमध्ये आधीच सेव्ह केलेला तुमचा नंबर पूर्णपणे हटेलच, याची हमी नसते.

Exit mobile version