WhatsAap चॅटींग करताना जहिरात पाहा नाही तर पैसे भरा; कंपनीने सांगितला प्लॅन

WhatsAap : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsAap ) या इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅपची मालकी फेसबुकची पॅरेंट कंपनी असेलल्या मेटाने घेतली. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे अनेकदा युझर्स नाराज देखील झाले. मात्र अद्याप देखील कंपनीकडून व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बदल करण्याचे काही थांबलेले नाही. त्यात आता कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटींग करताना जाहिराती दिसणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर कंपनीने प्रतिक्रिया देखील दिली आहे. […]

Whatsup New Features

Whatsup New Features

WhatsAap : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsAap ) या इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅपची मालकी फेसबुकची पॅरेंट कंपनी असेलल्या मेटाने घेतली. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे अनेकदा युझर्स नाराज देखील झाले. मात्र अद्याप देखील कंपनीकडून व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बदल करण्याचे काही थांबलेले नाही. त्यात आता कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटींग करताना जाहिराती दिसणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर कंपनीने प्रतिक्रिया देखील दिली आहे.

Sunil Shroff Passed Away: ‘ओह माय गॉड 2’ फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांचे निधन

व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटींग करताना जाहिराती दिसणार?

कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी आता व्हॉट्सअ‍ॅप हा इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म युझर्संना पैसे देऊन वापरायला देण्याच्या तयारीत आहेत. तशी तयारी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटींग करताना जाहिराती दिसणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर कंपनीने प्रतिक्रिया देखील दिली आहे. कंपनीचे विल कॅथकार्ट यांनी सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटींग करताना जाहिराती दिसणार. या अफवा आहेत. कंपनी असं करणार नाही. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत ही माहिती दिली.

पुन्हा येरे माझ्या मागल्या! गोकुळच्या बैठकीपूर्वीच गोंधळ; सतेज पाटील विरूद्ध महाडीक संघर्ष पेटला

त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, कंपनीने अद्याप जरी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटींग करताना जाहिराती दिसणार असल्याचा निर्णय घेतला नसला तरी देखील असा निर्णय घेण्यात आल्यास युझर्संना विना जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप वापरासाठी सशुल्क व्हॉट्सअ‍ॅपचा पर्याय देण्यात येणार असल्याच सांगण्यात आलं आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर आता पुन्हा एकदा युझर्स नाराज होणार असल्याचं दिसून येत आहे.

Exit mobile version