Download App

WhatsApp मध्ये करता येणार सिक्रेट चॅट; मार्क झुकरबर्ग यांनी लाँच केले तगडे फिचर

  • Written By: Last Updated:

Mark Zuckerberg has launched a new feature with the intention of making WhatsApp talk more secure.

सिक्रेट व्हॉट्सअॅप टॉक करणाऱ्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) एक नवीन फिचर लाँच केलं आहे. व्हॉट्सअॅपची मुख्य कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरला व्हॉट्सअॅप ‘चॅट लॉक फीचर’ असं म्हटलं जात आहे. या फिचरमुळे तुमचे काही निवडक चॅट अधिक सुरक्षित होतील असा दावा झुकरबर्ग यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये केला.

झुकरबर्गने यांनी या फिचरबद्दल माहिती देताना म्हटले की, हे फिचर तुमची सर्व वैयक्तिक माहिती पासवर्डद्वारे सुरक्षित ठेवेलं. ही सर्व माहिती एका स्वतंत्र फोल्डरमध्ये स्टोअर केली जाईल. जेव्हा संबंधित व्यक्ती तुम्हाला मेसेज करेल तेव्हा त्या व्यक्तीचे नाव आणि मेसेज तुमच्या नियमित चॅट लिस्टमध्ये दिसणार नाहीत. हे चॅट तुम्हाला फक्त पासवर्ड किंवा बायोमेट्रिक पद्धतीने ओपन करता येणार आहेत. या चॅटचे नोटिफिकेशनही येणार नाही.

दरम्यान, या फिचरमुळे तुमचा फोन इतर कोणाच्या हातात गेला किंवा तुमचे व्हॉट्सअॅप इतर कोणाच्या हातात पडले तरी तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता भासणार नाही. अनेकदा एकाच कुटुंबात एक फोन असतो, त्यामुळे तो इतर सदस्यांशीही शेअर करावा लागतो. किंवा काही वेळी एखादे चॅट खूपच सिक्रेट पद्धतीने ठेवायचे असते. अशा लोकांना हे फिचर उपयोगी पडणार आहे, या चॅट लॉकमध्ये फोनचाच लॉक कोड ठेवला जाणे आवश्यक नाही. हे स्वतंत्रपणे सेट केले जाऊ शकते, असे झुकरबर्ग यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅपने सुरक्षा आणि गोपनीयतेसंदर्भात यापूर्वी अनेक फिचर्स लाँच केले आहेत. यात एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, एनक्रिप्टेड चॅट बॅकअप, डिसअॅपरिंग मेसेज, स्क्रीनशॉट ब्लॉक करणे अशा फिचर्सचा समावेश आहे. आता आखी एका नवीन फिचरसह मेटा कंपनी व्हॉट्सअॅपची गोपनीयता आणि सुरक्षा अधिक मजबूत करू इच्छित आहे.

Tags

follow us