Banana Shape : सगळी फळं गोल, मग केळंच का ‘वाकडं’?; तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरं सापडलं!

Why Banana Shape Is Curve सफरचंद गोल, पेरू गोल, चिकू गोल... मग हे केळंच का 'वाकडं' जन्माला आलंय? यामागे निसर्गाचा एक असा 'खेळ' आहे.

Banana Shape : सगळी फळं गोल, मग केळंच का 'वाकडं'?; तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरं सापडलं!

Banana Shape : सगळी फळं गोल, मग केळंच का 'वाकडं'?; तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरं सापडलं!

Why Banana Shape Is Curve Know The Science : केळं… जगातलं असं फळ जे गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळेच आवडीने खातात. पण केळं खाताना कधी त्याचं नीट निरीक्षण केलंय का? सफरचंद गोल, पेरू गोल, चिकू गोल… मग हे केळंच का ‘वाकडं’ जन्माला आलंय? यामागे निसर्गाचा एक असा ‘खेळ’ आहे, ज्याला विज्ञान ‘फोटोट्रोपिज्म’ असं म्हणतं. चला तर मग, केळ्याच्या या ‘वाकड्या’ स्वभावामागची सरळ गोष्ट जाणून घेऊया…

सुरुवातीला असतं एकदम सरळ…

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण जेव्हा केळं झाडाला लागतं, तेव्हा ते इतर फळांसारखं एकदम सरळ असतं. केळीचा केळ्याचा संपूर्ण घड गुरुत्वाकर्षणामुळे खाली लटकलेला असतो. पण जसं जसं केळं मोठं होतं, तसा त्याचा ‘अ‍ॅटिट्यूड’ बदलतो म्हणजेच त्यात एक नैसर्गिक बदल घडून येतो.

काय आहे केळाचं ‘वाकडं’ विज्ञान?

केळीच्या या वाकड्या आकारामागे ‘फोटोट्रॉपिझम’ ही प्रक्रिया कारणीभूत आहे. फोटोट्रॉपिझम’ म्हणजे वनस्पतींची सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढण्याची प्रवृत्ती होय. आता जरी केळीचा संपूर्ण घड वजनामुळे खाली लटकलेला असला, तरी प्रत्येक केळ्याला सूर्यप्रकाश हवा असतो. आता घड तर खाली लटकलेला आहे, मग सूर्यप्रकाश मिळणार कसा? अशा वेळी केळं एक भन्नाट युक्ती करतं. ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन वरच्या दिशेला म्हणजेच सूर्याच्या दिशेने वळू लागतं. विज्ञानात याला ‘फोटोट्रॉपिझम’ म्हणजेच प्रकाशाकडे वळणे असे म्हटले जाते.

पण, इथेच गडबड होते. कारण, एकीकडे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण केळाला खाली खेचतं, तर दुसरीकडे सूर्यप्रकाश त्याला वर खेचतो. या ओढाताणीत बिचाऱ्या केळीचा आकार कायमचा वाकडा होऊन जातो. त्यामुळे पुढच्या वेळी केळं खाताना त्याच्या वाकड्या आकाराकडे पाहून हसू नका. कारण ते वाकडं असणं ही त्याची कमजोरी नाही, तर प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच झाडावर खाली लटकूनही ज्याला आभाळ गाठायची इच्छा आहे त्या जिद्दीचं नाव म्हणजे ‘केळं’ आहे. निसर्गाचं हे इंजिनीअरिंग तुम्हाला कसं वाटलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.

डिस्क्लेमर : ही माहिती सामान्य विज्ञानावर आधारित आहे. लेट्सअप मराठी याबाबत किंवा आकाराबाबत कोणताही दावा करत नाही.

Exit mobile version