Why During Hair Cutting Many People Feel Sleepy : तुम्ही कधी नाव्ह्याच्या खुर्चीवर बसलात आणि केस कापायला सुरुवात होताच मस्त डुलकी लागलीये? असं तुमच्यासोबत घडलं असेल, तर बॉस… तुम्ही एकटे नाही आहात. जगातल्या बहुतांश लोकांसोबत हे घडतं. सोशल मीडियावर नेहमीच हा चर्चेचा विषय असतो. पण, यामागे कोणताही आळस नसून विज्ञानाचा एक लय भारी खेळ आहे. चला तर मग, डोक्यावर कात्री आणि कंगवा फिरताच आपल्याला इतकी भारी झोप का येते, याबद्दलचं खास गुपित जाणून घेऊया…
कमालच झाली! आता मेंढ्यांच्या लोकरीने जोडली जाणार माणसांची तुटलेली हाडं; शास्त्रज्ञांचा मोठा शोध
डोक्याचं ‘कनेक्शन’ आणि नसांचं जाळं
आपल्या डोक्याची त्वचा म्हणजेच स्कॅल्प प्रचंड संवेदनशील असते, कारण तिथे नसांचं खूप मोठं जाळं पसरलेलं असतं. जेव्हा नाव्ह्याचे हलके हात, कंगवा किंवा कात्री आपल्या डोक्याला स्पर्श करतात, तेव्हा या नसा लगेच मेंदूला शांततेचे सिग्नल पाठवतात. हा हलका स्पर्श एखाद्या थेरपीसारखं काम करतो आणि शरीराला रिलॅक्स करतो.
मेंदूत सुटतात ‘आनंदाचे कारंजे’
केस कापताना किंवा हलकी मालिश होताना आपल्या मेंदूमध्ये रासायनिक बदल होतात. केस कापताना किंवा मालिश करताना मेंदुतील डोपामाइन आणि सेरोटोनिन हे मूड फ्रेश करतात आणि आनंदी ठेवतात. तर, ऑक्सिटोसिन हा स्पर्शामुळे निर्माण होणारा हार्मोन आहे, जो सुरक्षिततेची भावना देतो. याच वेळी टेन्शन देणारा ‘कोर्टिसोल’ हा स्ट्रेस हार्मोन झपाट्याने कमी होतो, ज्यामुळे डोळे आपोआप मिटू लागतात.
…म्हणून जगात 90% लोक ‘राइट-हँडेड’; ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी उलगडलं रहस्य
शरीराचा ‘रेस्ट मोड’ ऑन होतो
आपल्या शरीरात दोन प्रकारची नर्वस सिस्टम असते. एक आपल्याला संकटात लढायला शिकवते, तर दुसरी आपल्याला शांत करते. या शांत करणाऱ्या यंत्रणेला ‘पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम’ म्हणतात. जेव्हा नाव्ह्याच्या हातांची हालचाल या शांत करणाऱ्या सिस्टमला ॲक्टिव्ह करते. तेव्हा हृदयाचे ठोके थोडे संथ होतात.शरीराचे स्नायू एकदम सैल पडतात आणि शरीर पूर्णपणे ‘रेस्ट आणि डायजेस्ट’ मोडवर जातं.
सायन्स असं सांगतं की, नाव्ह्याच्या दुकानात झोप येणं हा पुरावा आहे की तुम्ही त्या वातावरणात स्वतःला 100% सुरक्षित आणि कम्फर्टेबल समजत आहात. तुमचं मन तिथे पूर्णपणे निर्धास्त असतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हेअर कटिंग करायला जाल आणि केसांसोबत डोळ्यांच्या पापण्याही जड होतील, तेव्हा अजिबात संकोच बाळगू नका. तुमच्या शरीराला आणि मेंदूला तिथे एक प्रकारची ‘फ्री व्हीआयपी थेरपी’ मिळत असते. त्यामुळे नाव्ह्याच्या खुर्चीवर मस्तपैकी डुलकी घ्या या नैसर्गिक सुखाचा आनंद घ्या.
