एका माऊसमध्ये सात बटणं, वेगवान स्क्रोलिंग आणि स्मार्ट कंट्रोल, Logitech MX Master 4 ची भारतात एंट्री

या माऊसवरील बटणं आपल्या कामानुसार सेट करता येतात. त्यामुळे वारंवार वेगवेगळे पर्याय शोधण्याची गरज पडणार नाही आणि कामही लवकर पूर्ण करता येईल.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 21T170353.615

Logitech MX Master 4 entry in India : कॉम्प्युटरवर फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा डिझाइनिंगचं काम करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लॉजिटेक कंपनीने भारतात आपला नवा एमएक्स मास्टर 4 क्रिएटर एडिशन माऊस लॉन्च केला आहे. हा खास माऊस असून, त्यामध्ये अनेक नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या माऊसवरील बटणं आपल्या कामानुसार सेट करता येतात. त्यामुळे वारंवार वेगवेगळे पर्याय शोधण्याची गरज पडणार नाही आणि कामही लवकर पूर्ण करता येईल.

भारतात या माऊसची मूळ किंमत 20 हजार 699 रुपये आहे. मात्र, सध्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हा माऊस 12 हजार 995 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच, ग्राहकांना मूळ किमतीपेक्षा 7 हजार 704 रुपये कमी मोजावे लागणार आहेत. हा माऊस मर्यादित संख्येत तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संकेतस्थळांवर साठा असेपर्यंतच तो खरेदी करता येणार आहे.

या माऊसचं डिझाइन नेहमीच्या माऊसपेक्षा वेगळं आहे. फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग करणारे लोक ज्या प्रकारचे रंगांचे नमुने, रेषा आणि वेगवेगळी चिन्हं वापरतात, त्याच धर्तीवर याची रचना करण्यात आली आहे. माऊसवर वेगवेगळ्या रंगांचे पट्टे आणि खास खुणा देण्यात आल्या आहेत. याशिवाय जागतिक छायाचित्रण दिन, जागतिक रचना दिन आणि जागतिक सर्जनशीलता दिन यांच्याशी संबंधित तारखाही त्यावर दिल्या आहेत.

तीन वर्षे शेतजमीन पडीक ठेवल्यास सरकारच्या ताब्यात जाणार? महसूलमंत्री बावनकुळेंचे महत्त्वाचे विधान!

या माऊसमध्ये एक खास स्पर्श नियंत्रण सुविधा देण्यात आली आहे. एखादं काम करताना किंवा संगणकावर सूचना आल्यावर माऊसमधून हलकं कंपन जाणवतं. त्यामुळे आपण कोणतं काम करत आहोत, याची माहिती मिळते. या कंपनाची पद्धतही आपल्या आवडीनुसार बदलता येते. यामध्ये अ‍ॅक्शन रिंग नावाचं खास बटणही आहे. हे बटण दाबताच संगणकाच्या पडद्यावर एक छोटी यादी उघडते. त्यामध्ये वेगवेगळ्या अ‍ॅप्सचे पर्याय, फोटो एडिटिंगसाठी लागणारी साधनं आणि इतर शॉर्टकट मिळतात. त्यामुळे प्रत्येक वेळी वेगळे पर्याय शोधत बसण्याची गरज राहत नाही.

या माऊसमध्ये मॅगस्पीड नावाचं खास स्क्रोल व्हील देण्यात आलं आहे. याच्या मदतीने एका सेकंदात तब्बल 1 हजार ओळींपर्यंत माहिती पुढे सरकवता येते, असा कंपनीचा दावा आहे. मोठ्या फाईल्स किंवा लांबलचक मजकूर वाचताना याचा चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच अगदी हळू आणि अचूक पद्धतीनेही हे चक्र फिरवता येतं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान आणि कमी आवाज करणारा माऊस आहे.

गोशाळांना मोठा दिलासा! जमीन कृषी दराने मिळणार, 2 लाखांवरील रोख व्यवहारांवरही सरकारचा नवा नियम

हा माऊस ब्लूटूथ किंवा यूएसबी टाइप-सी रिसीव्हरच्या मदतीने संगणकाशी जोडता येतो. यामध्ये नवीन चिप आणि सुधारित अँटेना देण्यात आला आहे. त्यामुळे आधीच्या माऊसच्या तुलनेत जोडणीची क्षमता दुप्पट झाल्याचा कंपनीचा दावा आहे. या माऊसमध्ये एकूण सात बटणं देण्यात आली आहेत. याशिवाय अंगठ्याने फिरवता येणारं वेगळं चक्रही आहे. हातात सहज बसेल अशी याची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसभर संगणकावर काम करणारे फोटो एडिटर, व्हिडिओ एडिटर, डिझायनर आणि कंटेंट तयार करणाऱ्यांसाठी हा माऊस उपयोगी ठरू शकतो.

follow us